सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
  • मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
  • नाशिकमध्ये प्रचंड गोंधळ, भाजपकडून पोलीस बंदोबस्तात AB फॉर्मचं वाटप; तिकिटाचा काळाबाजार होत असल्याचा इच्छुक उमेदवारांचा आरोप
  • पुण्यात भाजप अन् शिवसेनेची युती तुटली नाही; एबी फॉर्म दिलेत पण....; उदय सामंतांनी युतीचं चित्र केलं स्पष्ट
 राजकारण

मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता; शिंदे गटाचा आक्षेप, धाकधूक वाढली

डिजिटल पुणे    31-12-2025 17:35:52

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांच्या एबी (AB) फॉर्मवर डिजिटल स्वाक्षरी असल्याचा मुद्दा उपस्थित करत शिंदे गटाने निवडणूक अधिकाऱ्यांकडे अधिकृत आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे संबंधित उमेदवारांची उमेदवारी धोक्यात आली आहे.

एबी फॉर्मवरील डिजिटल सहीवर आक्षेप

मुंबईच्या मालाड पूर्वेतील उत्तर-पूर्व विभागातील निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्जांची छाननी सुरू असताना हा प्रकार उघडकीस आला. प्रभाग क्रमांक 38, 39, 40, 41 आणि 42 मधील शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारांच्या एबी फॉर्मवर डिजिटल स्वाक्षरी असल्याचे निदर्शनास आले.

शिंदे गटाची निवडणूक आयोगाकडे तक्रार

शिवसेना शिंदे गटाचे विभाग प्रमुख वैभव भरडकर यांनी यावर आक्षेप घेत निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार एबी फॉर्मवर पक्षप्रमुख किंवा अधिकृत पदाधिकाऱ्याची प्रत्यक्ष (हस्ताक्षरातील) स्वाक्षरी अनिवार्य असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे.

उमेदवारी बाद होण्याची शक्यता

नियमांचे उल्लंघन झाल्याचे सिद्ध झाल्यास ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांची उमेदवारी रद्द होऊ शकते. या प्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांनी तक्रार स्वीकारून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

ठाकरे गटात वाढली धाकधूक

या घडामोडीमुळे ठाकरे गटात मोठी अस्वस्थता निर्माण झाली असून, अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्णयावर आता या पाच उमेदवारांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे.


 Give Feedback



 जाहिराती