पुणे : पुण्यातील गुन्हेगारी विश्वात चर्चेत असलेला आंदेकर विरुद्ध कोमकर गँगवॉर आता थेट राजकारणातही दिसून येणार आहे. आंदेकर टोळीने हत्या केल्याचा आरोप असलेल्या आयुष कोमकरच्या आई कल्याणी कोमकर यांनी पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 23 मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे हा अर्ज त्यांनी थेट सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर यांच्या विरोधात भरला आहे.
कल्याणी कोमकर यांनी सुरुवातीला शिंदे गटाच्या शिवसेनेकडे उमेदवारीची मागणी केली होती. मात्र उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर कल्याणी कोमकर यांनी आपला अपक्ष अर्ज भरला. त्यामुळे पुण्यात पुन्हा एकदा आंदेकर विरुद्ध कोमकर हा संघर्ष निवडणुकीच्या रिंगणात पाहायला मिळणार आहे.
अजित पवारांनी आंदेकर कुटुंबीयांना उमेदवारी दिल्यास आत्मदहन करेन, असा इशाराही कल्याणी कोमकर यांनी यापूर्वी दिला होता. आंदेकरांना तिकीट देऊ नये, अशी मागणी करत त्यांनी पक्ष नेतृत्वावरही जोरदार टीका केली होती.
कल्याणी कोमकरांचे गंभीर आरोप
कल्याणी कोमकर म्हणाल्या, “आंदेकरांच्या विरोधात मी निवडणूक लढवणार आहे. अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी मला उमेदवारी द्यावी. अजित पवार ‘कोयता गँग थांबवा’ असे म्हणतात, मग अशा लोकांना तिकीट कसे दिले जाते?”पुढे बोलताना त्यांनी आरोप केला की, आंदेकरांना काही राजकीय लोकांचा पाठिंबा आहे. “जर कोणत्याही पक्षाने त्यांना तिकीट दिले, तर मी त्या पक्षाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करेन,” असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, कोमल आंदेकर यांनी या आरोपांचे खंडन केले आहे. “वनराज आंदेकर माझा भाऊ आहे. मी माझ्याच भावाची सुपारी का देईन? आम्ही काहीही केलेले नाही, तरी आम्हाला भोगावे लागत आहे. वनराज आंदेकरच्या हत्येत आमचा कोणताही संबंध नाही,” असे त्या म्हणाल्या.या पार्श्वभूमीवर पुण्यातील महापालिका निवडणूक अधिकच तापण्याची शक्यता असून गुन्हेगारी व राजकारणाच्या संघर्षाने शहरातील वातावरण ढवळून निघाले आ