सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
  • मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
  • नाशिकमध्ये प्रचंड गोंधळ, भाजपकडून पोलीस बंदोबस्तात AB फॉर्मचं वाटप; तिकिटाचा काळाबाजार होत असल्याचा इच्छुक उमेदवारांचा आरोप
  • पुण्यात भाजप अन् शिवसेनेची युती तुटली नाही; एबी फॉर्म दिलेत पण....; उदय सामंतांनी युतीचं चित्र केलं स्पष्ट
 विश्लेषण

नूतन वर्ष महाराष्ट्राचे, महाराष्ट्राच्या समृद्धीचे, विकासाचे नवपर्व आणणारे -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डिजिटल पुणे    01-01-2026 10:46:34

मुंबई : नूतन वर्ष महाराष्ट्राचे, महाराष्ट्राच्या समृद्धीचे, विकासाचे नवपर्व आणणारे ठरेल, असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना नववर्ष प्रारंभाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नवीन वर्ष प्रारंभाच्या पूर्वसंध्येला दिलेल्या शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, ‘सरत्या वर्षातील कटू प्रसंगांना विसरूया आणि सुमधूर आठवणींकडून प्रेरणा घेत, पुढे जाऊया. महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात अग्रेसर, नेतृत्व करणारे राज्य आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीची पताका अशीच फडकत राहो, यासाठी आपण एकजूट करूया. महाराष्ट्राच्या मातीत आव्हाने स्वीकारण्याची धमक आहे. आव्हाने आलीच, तर त्यावर मात करण्याचा निर्धार करुया. नवे वर्ष नवचैतन्य घेऊन येणारे, आशा, आकांक्षांना बळ देणारे ठरेल, अशी आशा व्यक्त करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी नववर्ष सर्वांसाठी आरोग्यदायी, सर्वच क्षेत्रात भरभराट, समृद्धी घेऊन येणारे ठरावे, अशा शुभेच्छा दिल्या.


 Give Feedback



 जाहिराती