सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
  • मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
  • नाशिकमध्ये प्रचंड गोंधळ, भाजपकडून पोलीस बंदोबस्तात AB फॉर्मचं वाटप; तिकिटाचा काळाबाजार होत असल्याचा इच्छुक उमेदवारांचा आरोप
  • पुण्यात भाजप अन् शिवसेनेची युती तुटली नाही; एबी फॉर्म दिलेत पण....; उदय सामंतांनी युतीचं चित्र केलं स्पष्ट
 विश्लेषण

विकसित,प्रगत महाराष्ट्राचा निर्धार नवीन वर्ष राज्याच्या प्रगतीचा सुवर्णकाळ ठरो ;उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नवीन वर्षाच्या शुभेच्छा

डिजिटल पुणे    01-01-2026 10:54:03

मुंबई : नवी स्वप्नं, नवी आशा, नव्या आकांक्षा आणि नवे संकल्प उरात बाळगून नविन वर्षाच्या स्वागतासाठी महाराष्ट्र सज्ज असून हे नवीन वर्ष राज्याच्या प्रगतीचा सुवर्णकाळ ठरो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नागरिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, २०२५ हे वर्ष राज्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरले असून, आता २०२६ मध्ये आपल्याला अधिक वेगाने घोडदौड करायची आहे. सरत्या वर्षातील यशाचा वारसा पुढे नेत, नवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी महाराष्ट्र सज्ज असल्याचे त्यांनी आपल्या शुभसंदेशात म्हटले आहे.

नवीन वर्ष आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो. आपण सर्वांनी मिळून महाराष्ट्राला देशातील क्रमांक एकचे राज्य बनवण्यासाठी कटिबद्ध होऊया असे आवाहन देखील उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले आहे.


 Give Feedback



 जाहिराती