उरण : "राजकारण, शिक्षण, समाजकारण, खेळ या सर्व क्षेत्रात,प्रांतात लीलया वावरणारे महेंद्रशेठ घरत हे अष्टपैलू खेळाडू आहेत. राजकारणापलीकडे मैत्री जोपासण्यासाठी महेंद्रशेठ यांची ख्याती आहे. आमच्या नात्यात कधीही राजकारण आडवे येणार नाही, यासाठी आम्ही कटाक्ष बाळगतो. आज एमजी ग्रुपचे सहकारी एकत्र येऊन वर्षाच्या शेवटी क्रिकेटद्वारे आनंद घेत आहेत, ही सुद्धा आनंददायी बाब आहे. त्याबद्दल सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो आणि महेंद्रशेठचे कौतुक करतो," असे माजी खासदार रामशेठ ठाकूर शिवाजीनगर येथे म्हणाले. एमजी ग्रुप प्रिमीयर लिगला बुधवारी (ता. ३१) रामशेठ ठाकूर यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी बांधकाम क्षेत्रात नावाजलेल्या 'टुडे ग्रुप'चे बद्रेश भाई उपस्थित होते. त्यांनीही क्रिकेटचा आनंद घेतला. यावेळी ते म्हणाले, "आयुष्य कसे जगावे हे मी महेंद्रशेठ घरत यांच्याकडून शिकलो. ते माझे आयडॉल आहेत. त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे. आमची मैत्री अबाधित राहील."वर्षभर आपण आपापल्या कामात व्यस्त असतो, कुणी स्वतःसाठी जगतो, कुणी दुसऱ्यांसाठी, परंतु धावपळ ही करावीच लागते. वेळेचे नियोजन करावे लागते. वर्ष संपता संपता बरेच जण नवीन वर्षाचे प्लॅनिंग करतो, पण नव्याचे नऊ दिवस उलटल्यानंतर पुन्हा 'जैसे थे' प्रवास सुरू होतो. परंतु आजचा दिवस आजच उत्तम जगा, आरोग्य सांभाळा, दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवा, दिवस उजाडताच परमेश्वराचे रोज आभार माना, कारण एक नवीन दिवस आपल्या आयुष्यात बोनस मिळतोय, त्याचा सदुपयोग करा....
अशी विचारसरणी असणारे आणि स्वतः अंगिकारणारे महेंद्रशेठ घरत हे बहुआयामी नेतृत्व. त्यांनी वर्षाच्या शेवटी (३१ डिसेंबर २०२५) आपल्या सर्व सहकाऱ्यांना मैदानावर उतरवले. त्यांनी क्रिकेटच्या माध्यमातून सर्वकाही विसरा, आता फक्त मनसोक्त खेळा आणि आनंद घ्या, म्हणून त्यांनीच आपल्या सहकारी बांधवांना रोजच्या धावपळीत उसंत मिळावी म्हणून शिवाजी नगरच्या मैदानावर क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले होते. एमजी ग्रुपच्या प्रिमीयर लिगचे उद्घाटन उद्योजक मयुरेश चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महेंद्रशेठ घरत यांच्याशी निगडित असणारे सर्व सहकारी उपस्थित होते. सर्व सहकारी बांधवांना मनमुराद आनंद मिळावा, या एकाच उद्देशाने या प्रिमीयर लिगचे आयोजन करण्यात आले होते. सर्व सामने अतिशय रंगतदार झाले. एमजी टायगर्स, एमजी फायटर्स, एमजी लायन्स, एमजी वारियर्स अशा चार संघांत अतितटीच्या लढती झाल्या. कर्णधार महेंद्रशेठ घरत, डॉ. मनीष पाटील, मनोज फडकर, विनोद म्हात्रे यांनी आपापल्या संघांचे नेतृत्व केले. अंतिम सामना एमजी टायगर्स आणि एमजी फायटर्स यांच्यात रंगला.
ही लढत अत्यंत चुरशीची झाली. त्यात अंतिम विजेतेपदाचे मानकरी एमजी फायटर्स ठरले. त्यांना पहिल्या क्रमांकाचे बक्षीस म्हणून चषक देऊन गौरविण्यात आले, तर उपविजेतेपद एमजी टायगर्स यांनाही चषक मिळाले. महेंद्रशेठ घरत यांनी एकूण ६३ धावा काढल्या. महेंद्रशेठ घरत यांनी ५८ व्या वर्षी एका सामान्यात ९ चेंडूंत २७ धावा काढल्या. मालिकावीर म्हणून अंगद ठाकूर यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी मनीष पाटील म्हणाले, "सुसज्ज मैदानावर खेळताना रंगत आली. आजचा आनंद अविस्मरणीय आहे."
आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत म्हणाले, "३१ डिसेंबर हा दिवस सर्वांनी एकत्र येऊन साजरा करावा. क्रिकेट खेळून तो आनंद द्विगुणित करावा, हा प्रीमियर लीगचा उद्देश होता. तो सर्वांनी मनमुराद खेळून सिद्ध करून दाखविलात, त्याबद्दल एमजी ग्रुपचे अभिनंदन. सुदृढ शरीरयष्टी हीच खरी संपत्ती आहे."यावेळी ललित भाई, वाय. टी. देशमुख, साई मंदिर वहाळचे अध्यक्ष रविशेठ पाटील, माजी सैनिक निलेश म्हात्रे, के. डी. कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.