सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी : घरकाम करणाऱ्या महिलांना 1500 रुपये, 700 स्के. फू. घरांना प्रॉपर्टी टॅक्स माफ, तरुणांना लाख रु सहाय्यता निधी, ठाकरेंचा मुंबईसाठी जाहीरनामा
  • मोठी बातमी : मविआला मोठा धक्का, तब्बल 7 उमदेवारांची माघार, पनवेलमध्ये भाजपचा बिनविरोध धमाका
 जिल्हा

सातारा जिल्हा पर्यटन छायाचित्र प्रदर्शनाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन

डिजिटल पुणे    02-01-2026 14:37:53

सातारा  : जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या मेहनतीतून साकारलेल्या सातारा जिल्हा पर्यटन छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.

अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या वतीने सातारा येथे 1 ते 4 जानेवारील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येथे सातारा येथे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने सातारा जिल्ह्यातील  पर्यटन स्थळांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन शाहु क्रीडा संकुल येथे मांडण्यात आले. या उद्घाटन सोहळ्याला संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अखील भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, कार्यवाहक सुनीताराजे पवार आदी उपस्थित होते.

हे प्रदर्शन अत्यंत सुंदर व सातारा जिल्ह्यातील गड किल्ले, ऐतिहासिक, सांस्कृतिक पर्यटन स्थळे यांचे समग्र दर्शन घडविणार आहे. चार दिवसांच्या साहित्य संमेलनामध्ये  हजारो साहित्यीक रसिक संमेलनासाठी येणार आहेत. त्यांना सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहित या ठिकाणी  छायाचित्रांच्या माध्यमातून उपलब्ध होईल यातून जिल्ह्याच्या पर्यटन वाढीस मदत होईल, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. भोसले यांनी व्यक्त केला.

महाबळेश्वर पाचगणी बरोबरच या सर्व पर्यटन स्थळांचा आस्वाद या छायाचित्रांमधून आपल्याला मिळतो. हे प्रदर्शन कायमस्वरूपी जिल्हाधिकारी कार्यालयात मांडण्यात येणार आहे असे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सांगितले. शासकीय इमारती या केवळ शासकीय इमारतींच्या भिंती या केवळ भिंती न राहता त्या जिवंत व्हाव्यात आणि त्यांनी आपला इतिहास, आपली संस्कृती, आपलं निसर्ग सौंदर्य याविषयी या ठिकाणी येणाऱ्यांशी हितगुज करावं यासाठी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची ही संकल्पना खरोखरच नाविन्यपूर्ण आहे. हे प्रदर्शन अत्यंत अल्प कालावधीमध्ये उभे करण्यात जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अत्यंत मोलाचे सहकार्य आहे. यामध्ये जिल्ह्यातील नामवंत छायाचित्रकारांच्या छायाचित्रांचा समावेश आहे.

यामध्ये महाबळेश्वर मधील विविध पर्यटन स्थळे, पाचगणी, वाईचे गणपती मंदिर आहे. प्रतापगड येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, भवानी मातेचे मंदिर, शिवकालीन दगडी पूल, सज्जनगड, तिच्यावरील रामदास स्वामींची समाधी, पाटेश्वर जे केवळ साताऱ्यापासून 14 किलोमीटर अंतरावरच आहे या ठिकाणी इतकी असंख्य शिवलिंगे आहेत. तितकी शिवलिंगे अन्यत्र कोठेच आपल्याला दिसणार नाहीत. यासह शिलालेख, दीपमाळ, तलाव आहेत. केळवली, ठोसेघरचा धबधबा, शिखर शिंगणापूर मंदिर, चाळकेवाडी इथल्या पठारावरील पवन ऊर्जा प्रकल्प, अनेक विविध रंगांनी फुललेले कासचे पठार, कासचा तलाव, सातारा येथील अजिंक्यतारा, कराड जवळची आगाशिवची लेणी, प्रीतीसंगम, मेनवलीचा घाट, कोयना धरणाचा परिसर, बामनोली,तापोळा इथले वॉटर स्पोर्ट्स, पाली, क्षेत्र माहुली, संगमाहुली, जबलेश्वर या ठिकाणची मंदिरे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे नायगाव येथील जन्मस्थळ, 12 व्या शतकातील बांधलेली नकट्या रावळाची विहीर, धोमचे मंदिर, लिंब येथील बारामोटेची विहीर, औंध आणि सातारा येथील वस्तुसंग्रहालय, कोयना अभयारण्य, त्यातली वनसंपदा अशा अनेक विषयांवरील छायाचित्रे या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. जी पहात असताना खरोखरच पाहणाऱ्याची तहानभूक हरपून जाते.


 Give Feedback



 जाहिराती