सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्यात भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध; मंजुषा नागपुरे आणि श्रीकांत जगताप विजयी
  • मोठी बातमी : घरकाम करणाऱ्या महिलांना 1500 रुपये, 700 स्के. फू. घरांना प्रॉपर्टी टॅक्स माफ, तरुणांना लाख रु सहाय्यता निधी, ठाकरेंचा मुंबईसाठी जाहीरनामा
  • मोठी बातमी : मविआला मोठा धक्का, तब्बल 7 उमदेवारांची माघार, पनवेलमध्ये भाजपचा बिनविरोध धमाका
 विश्लेषण

सहकार भवनाचे उपमुख्यमंत्र्यानी केले भूमीपूजन ;शहरातील मुख्य रस्त्यावर होणार 5 मजली इमारत

डिजिटल पुणे    02-01-2026 16:19:35

बीड : शहरातील मुख्य रस्त्यालगत उभारण्यात येणा-या सहकार भवन इमारतीचा भूमीपूजन सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.येथील जालना रोडवर ही इमारत बांधण्यात येईल यासाठी 14 कोटी 98 लक्ष 79 हजार रुपये निधीची मान्यता देण्यात आली आहे. तळमजला पार्कींग व त्यावर 4 मजले अशी ही भव्य इमारत असेल. इमारतीचे एकूण क्षेत्र 2305.19 चौरस मीटर इतके राहणार आहे.

या इमारतीमध्ये सर्व सहकार संबधित कार्यालये एकत्र येणार आहेत.आजच्या या भूमीपूजन सोहळयास जिल्हयाचे खासदार बजरंग सोनावणे, विधान परिषद सदस्य विक्रम काळे तसेच आमदार विजयसिंह पंडीत, संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतूल चव्हाण, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सतीष तोटावर, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रविंद्र तोंडे, विशेष लेखा परिक्षक धनंजय चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.


 Give Feedback



 जाहिराती