सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! मुंबईत ठाकरे-पवारांच्या युतीला दे धक्का; उमेदवाराने परस्पर अर्ज माघारी घेतला; निवडणुकांपूर्वीच 1 जागा झाली कमी
  • सूर्याजी पिसाळसारखा मिंधे 400 वर्ष लक्षात राहिल, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर प्रहार, मोदींसह शाहांवरही टीका
  • पुण्यात भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध; मंजुषा नागपुरे आणि श्रीकांत जगताप विजयी
  • मोठी बातमी : घरकाम करणाऱ्या महिलांना 1500 रुपये, 700 स्के. फू. घरांना प्रॉपर्टी टॅक्स माफ, तरुणांना लाख रु सहाय्यता निधी, ठाकरेंचा मुंबईसाठी जाहीरनामा
  • मोठी बातमी : मविआला मोठा धक्का, तब्बल 7 उमदेवारांची माघार, पनवेलमध्ये भाजपचा बिनविरोध धमाका
 राजकारण

मोठी बातमी : मविआला मोठा धक्का, 7 उमेदवारांची माघार; पनवेलमध्ये भाजपचे 8 उमेदवार बिनविरोध

डिजिटल पुणे    02-01-2026 16:31:42

नवी मुंबई :  राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये भाजपचा बिनविरोध विजयाचा सिलसिला कायम असून, पनवेल महानगरपालिकेत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल 7 उमेदवारांनी माघार घेतल्याने भाजपचे एकूण 8 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.पनवेल महापालिकेतील प्रभाग क्रमांक 18 (ब) मधून भाजपचे नितीन पाटील हे सर्वप्रथम बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आले. शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज छाननी प्रक्रियेत बाद झाल्याने पाटील यांची निवड निर्विवाद झाली.

त्यानंतर आज अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी शिवसेना ठाकरे गट, शेकाप आणि काँग्रेसच्या 7 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे भाजपचे आणखी 7 उमेदवार बिनविरोध झाले. त्यामुळे पनवेल महापालिकेत महायुतीचे एकूण 8 नगरसेवक बिनविरोध निवडून आले असून औपचारिक घोषणा बाकी आहे.

बिनविरोध निवडून आलेले उमेदवार

नितीन पाटील

रुचिता लोंढे

अजय बहिरा

दर्शना भोईर

प्रियंका कांडपिळे

ममता प्रितम म्हात्रे

स्नेहल ढमाले

पनवेलमध्ये भाजपची पकड मजबूत

2017 साली पनवेल महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आली होती. एकूण 78 नगरसेवकांपैकी 51 नगरसेवक भाजपचे होते. यंदा भाजप-शिवसेना (शिंदे गट) युती असल्याने सत्ता कायम राखण्याचा भाजपचा आत्मविश्वास अधिक बळावला आहे.

भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी “आतापर्यंत केलेल्या विकासकामांच्या जोरावर ही निवडणूक लढवली जात असून पुन्हा भाजपचाच महापौर बसेल,” असा विश्वास व्यक्त केला आहे.

पनवेल महापालिका – जागावाटप

महायुती

एकूण जागा : 78

भाजप : 71

शिवसेना (शिंदे गट) : 4

राष्ट्रवादी (अजित पवार गट) : 2

आरपीआय (आठवले गट) : 1

महाविकास आघाडी

शेकाप : 33

शिवसेना (ठाकरे गट) : 19

काँग्रेस : 12

राष्ट्रवादी (शरद पवार गट) : 7

मनसे : 2

समाजवादी पार्टी : 1

वंचित बहुजन आघाडी : 1

इतर : 3

पनवेलचे राजकीय गणित

पनवेलचे राजकारण माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या भोवती केंद्रित राहिले आहे. ठाकूर कुटुंबीय ज्या पक्षात गेले, त्या पक्षाची सत्ता पनवेलमध्ये आली, असा आजवरचा इतिहास आहे. सध्या शेकाप कमकुवत झाल्याने भाजपसमोर ठोस विरोधक उरलेला नसल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. त्यामुळे पनवेल महापालिकेत भाजपची सत्ता पुन्हा येण्याची शक्यता प्रबळ मानली जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती