सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! मुंबईत ठाकरे-पवारांच्या युतीला दे धक्का; उमेदवाराने परस्पर अर्ज माघारी घेतला; निवडणुकांपूर्वीच 1 जागा झाली कमी
  • सूर्याजी पिसाळसारखा मिंधे 400 वर्ष लक्षात राहिल, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर प्रहार, मोदींसह शाहांवरही टीका
  • पुण्यात भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध; मंजुषा नागपुरे आणि श्रीकांत जगताप विजयी
  • मोठी बातमी : घरकाम करणाऱ्या महिलांना 1500 रुपये, 700 स्के. फू. घरांना प्रॉपर्टी टॅक्स माफ, तरुणांना लाख रु सहाय्यता निधी, ठाकरेंचा मुंबईसाठी जाहीरनामा
  • मोठी बातमी : मविआला मोठा धक्का, तब्बल 7 उमदेवारांची माघार, पनवेलमध्ये भाजपचा बिनविरोध धमाका
 क्राईम

अकोल्यात खळबळ!समलिंगी नात्यातील संशयातून तरुणाची निर्घृण हत्या;तीन वर्षे एकत्र राहणाऱ्या तरुणांमध्ये वादातून घटना

डिजिटल पुणे    02-01-2026 17:50:15

अकोला : पश्चिम विदर्भातील अकोला जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली असून, समलिंगी नात्यातील संशय आणि वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अकोला शहरातील मोठी उमरी परिसरात ही घटना घडली असून, यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.या घटनेत ३० वर्षीय किरन (नाव बदलले आहे) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्याच्यासोबत वास्तव्यास असलेला नितेश अरुण जंजाळ (रा. संजय नगर, मोठी उमरी) यानेच ही हत्या केल्याचा आरोप पोलिस तपासात समोर आला आहे. पोलिसांनी नितेशला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

नेमकं काय घडलं?

आज सकाळी संजय नगर परिसरात नितेश जंजाळ हा घराबाहेर येत जोरजोराने आरडाओरड करू लागला. “किरन खाली पडला असून तो मरण पावला आहे,” असे सांगत त्याने नागरिकांना घटनास्थळी जमा केले. घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाईन पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.घराची तपासणी केली असता किरनच्या अंगावर गंभीर जखमा आढळून आल्या. विशेषतः डोक्यावर आणि तोंडावर जबर मारहाण झाल्याचे स्पष्ट दिसून आल्याने पोलिसांना हत्या झाल्याचा संशय बळावला.

पोलिस तपासात उघडकीस आली हत्या

पोलिसांनी नितेश जंजाळची सखोल चौकशी सुरू केली. तपासादरम्यान किरनसोबत राहणाऱ्या नितेशनेच त्याची हत्या केल्याची बाब उघडकीस आली. प्राथमिक माहितीनुसार, लाठी-काठीसारख्या कठीण वस्तूने डोक्यावर आणि तोंडावर जोरदार वार करण्यात आल्याने किरनचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

नात्यातील संशय ठरला वादाचे कारण

मिळालेल्या माहितीनुसार, किरन आणि नितेश हे मागील तीन वर्षांपासून एकत्र राहत होते. सुरुवातीला मैत्री असलेले हे नाते पुढे समलिंगी रिलेशनशिपमध्ये बदलले. मात्र, अलीकडच्या काळात किरन इतर कोणाशी संबंध ठेवत असल्याच्या संशयावरून दोघांमध्ये सतत वाद होत होते.काल रात्रीही याच कारणावरून त्यांच्यात जोरदार भांडण झाले. नितेशने बाहेरून जेवण आणल्यानंतर वाद अधिक वाढला आणि त्यातूनच ही दुर्दैवी घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

आरोपी ताब्यात; तपास सुरू

पोलिसांनी आरोपी नितेश जंजाळ याला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सिव्हिल लाईन पोलीस करत आहेत.


 Give Feedback



 जाहिराती