सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! मला चक्कर येतेय, नारायण राणेंना भोवळ, थांबवलं भाषण; कालच दिले राजकीय निवृत्तीचे संकेत
  • भाजपात मुख्यमंत्र्यांविरुद्ध गट सक्रीय, नाना पटोलेंचा गौप्यस्फोट; 'बिनविरोध'वरुन निवडणूक आयुक्तांवरही हल्लाबोल
 शहर

बाबुरावजी घोलप महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी

डिजिटल पुणे    03-01-2026 15:40:15

पुणे : बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील विशेष दिन समिती तर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संगीता जगताप होत्या . याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. महाविद्यालयातील परीक्षा विभाग प्रमुख डॉ. सुभाष वाव्हळ यांनी आपल्या मनोगतात सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आढावा घेतला डॉ. रमाकांत कस्पटे यांनी सावित्रीबाई फुले यांच्यावरील कविता सादर केली. डॉ. जितेंद्र वडशिंगकर यांनी फुले दांपत्याचे कार्य स्पष्ट करत असताना इतिहासातील अनेक दाखले दिले व अतिशय रंजकपणे तो काळ सर्वांसमोर उभा केला. याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून मानसी भिसे, वैष्णवी मोरे, कृतिका कांबळे आणि अभिषेक चाटे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.त्यांच्या मनोगतातून सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आढावा घेत सावित्रीबाई फुले यांच्या विषयी असलेला आदर व्यक्त होत होता. .

आपल्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संगीता जगताप यांनी नायगाव येथील जन्मस्थळी जाऊन सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीला अभिवादन केले ती आठवण सांगत आज सावित्रीबाईंमुळे माझ्यासारख्या अनेक स्त्रिया उच्च स्थान भूषवित आहेत व वेगवेगळ्या जबाबदाऱ्या समर्थपणे पेलत आहेत याचे श्रेय सावित्रीबाईंच्या कार्यालाच आहे असे त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. वंदना पिंपळे यांनी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विशेष दिन समिती समन्वयक प्रा. अपर्णा पांडे यांनी केले याप्रसंगी त्यांनी सावित्रीबाईंच्या व्यक्तिमत्त्वाचा आढावा घेत असताना सावित्रीबाईंच्या लेखनाचा आढावा घेतला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. चंदा हसे यांनी केले. याप्रसंगी प्रा. प्रियंका महाजन , ऐश्वर्या उगिले , अंजली महाले, दिया बोडके, साक्षी सपकाळ यांनी कार्यक्रम स्थळी रांगोळी काढली.सुरेखा चिंचवडकर, मालन साळुंखे ,श्री राजू लांडगे, स्मिता गायकवाड, कार्यक्रमाच्या संयोजनात यांची मदत झाली कार्यक्रमाचे छायाचित्रण श्री. प्रणित पावले यांनी केले.


 Give Feedback



 जाहिराती