सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • प्रचारात महापुरुषांपुढे बायका नाचवता, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? ठाकरे गटाचा अमित साटमांवर हल्लाबोल
  • उमेदवारांना पैसे वाटताना मला कोणी भेटलं तर तिथेच बदडून काढणार; खैरेंचा इशारा, बावनकुळेंवरही टीका
  • दिवंगत वडिलांवर भाजपकडून टीका होताच विलासरावांच्या लेकानं ऐकवलं, रितेश देशमुखनं सुनावल्यानंतर रवींद्र चव्हाणांची सपशेल दिलगिरी,
  • मनसेला आणखी एक धक्का, दोघांचा शिवसेनेत प्रवेश; माजी आमदारानेही भाजप सोडली, शिंदेंच्या उपस्थितीत भगवा हाती
  • मोठी बातमी : शिंदेसेनेला बाजूला ठेवून भाजपची काँग्रेससोबत युती, मुंबईच्या वेशीवर देशातील सर्वात मोठी राजकीय घडामोड
 विश्लेषण

कुलाबा जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने प्रतिक दर्णे सन्मानित.

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी)    05-01-2026 10:46:44

उरण : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा वैद्यकीय सांस्कृतिक तसेच पत्रकारिता या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना ३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी सहा वाजता मुक्काम सातीर्जे,पोस्ट मापगाव, तालुका अलिबाग जिल्हा रायगड येथे कुलाबा जीवनगौरव राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात हा पुरस्कार ज्येष्ठ नेते भाई जगताप, जेष्ठ नेते जयंत पाटील,ऍड.उमेश ठाकूर, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते प्रतिक दर्णे यांना प्रदान करण्यात आला. स्वर्गीय आमदार मधुशेठ ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट अलिबाग,भाई जगताप मित्र मंडळ रायगड, ऍड.उमेश ठाकूर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग येथे कुलाबा जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांना कुलाबा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.उरणचे सुपुत्र प्रतिक प्रविण दर्णे (नवीन शेवा )यांनी यापूर्वी अनेक राज्यस्तरीय, आंतरराष्ट्रीय पदके,बक्षीस पटकाविले आहेत. प्रतिक प्रविण दर्णे यांनी यापूर्वी आंतरराष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धेत भाग घेऊन भारताला ब्रांझ पदक मिळवून दिले आहे.त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले असून २०२५ मध्ये द्रोणागिरी भूषण तर आता नुकताच कुलाबा जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे.प्रतिक प्रविण दर्णे यांची प्रतिष्ठित समजला जाणारा रायगड जिल्हा परिषदेचे मार्फत दिला जाणारा रायगड भूषण पुरस्कार करिता नामांकन सुद्धा झालेला आहे.प्रामाणिक,मेहनती,स्वच्छ चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व व देशासाठी महत्त्वाचे योगदान देणाऱ्या नवीन शेवा गावचे सुपुत्र प्रतिक प्रविण दर्णे यांना कुलाबा जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने त्यांच्यावर सर्वच क्षेत्रातून शुभेच्छा व अभिनंदनचा वर्षात होत आहे.


 Give Feedback



 जाहिराती