उरण : उरण मधील व उरणच्या बाहेर नागरिकांना, पर्यटकांना उरणच्या आगरी कोळी कराडी संस्कृतीची ओळख व्हावी, उरणची खाद्य संस्कृती कला क्रीडा इत्यादीचे नागरिकांना ओळख व्हावी, मनोरंजनाचा आस्वाद लुटता यावा या अनुषंगाने आई शांतेश्वरी सामाजिक संस्था उरण नवीन शेवा या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गुरुवार ८ जानेवारी २०२६ ते बुधवार २१ जानेवारी २०२६ या कालावधीत शांतेश्वरी मैदान, शिवराय चौक, नवीन शेवा,द्रोणागिरी, उरण येथे आगरी कोळी कराडी द्रोणागिरी महोत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे.या महोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांना विविध मनोरंजनाचा, कला, नाट्य,खाद्य संस्कृती,विविध स्पर्धा कार्यक्रमाचा आनंद लुटता येणार आहे. नागरिकांनी या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊन द्रोणागिरी महोत्सव २०२६ चा आनंद लुटावा असे आवाहन आई शांतेश्वरी सामाजिक संस्था नवीन शेवा तर्फे करण्यात आले आहे.