सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • प्रचारात महापुरुषांपुढे बायका नाचवता, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? ठाकरे गटाचा अमित साटमांवर हल्लाबोल
  • उमेदवारांना पैसे वाटताना मला कोणी भेटलं तर तिथेच बदडून काढणार; खैरेंचा इशारा, बावनकुळेंवरही टीका
  • दिवंगत वडिलांवर भाजपकडून टीका होताच विलासरावांच्या लेकानं ऐकवलं, रितेश देशमुखनं सुनावल्यानंतर रवींद्र चव्हाणांची सपशेल दिलगिरी,
  • मनसेला आणखी एक धक्का, दोघांचा शिवसेनेत प्रवेश; माजी आमदारानेही भाजप सोडली, शिंदेंच्या उपस्थितीत भगवा हाती
  • मोठी बातमी : शिंदेसेनेला बाजूला ठेवून भाजपची काँग्रेससोबत युती, मुंबईच्या वेशीवर देशातील सर्वात मोठी राजकीय घडामोड
 राजकारण

दादा हाच का तुमचा वादा म्हणत सुस बाणेरकरांनी दाखवला अजित पवारांना आरसा

डिजिटल पुणे    05-01-2026 10:53:31

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 9 हा चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. याच प्रभागातून भाजपने लोकप्रियता घटलेल्या माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांचा पत्ता कट केला होता. पुण्यामध्ये भाजपने तब्बल 40 विद्यमान आमदारांचे तिकीट कापली. बहुतांश ठिकाणी माजी नगरसेवकांनी पक्षाचा आदेश स्वीकारून एकनिष्ठ राहत पक्षाने दिलेल्या उमेदवाराचं काम करण्यास सुरुवात केली आहे.

प्रभाग क्रमांक नऊ मध्ये पक्षाने लोकप्रियता घटल्याने अमोल बालवडकर यांना काही काळ थांबण्यास सांगितलं होतं. मात्र अति आत्मविश्वासा पोटी अमोल बालवडकर यांनी पक्षाशी पंगा घेत उपमुख्यमंत्री अजित पवारांशी हात मिळवणीकेली आणि भाजपाशी बंडखोरी केली आहे. बालवडकर यांच्या या बंडखोरीमुळे एकीकडे भाजपला मला मानणारा वर्ग नाराज झाला असून दुसरीकडे आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधून देखील नाराजीचा सूर उमटताना पाहायला मिळत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रभाग क्रमांक नऊ मध्ये प्रचाराला उपस्थिती लावली मात्र या प्रचाराच्या सभेच्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निष्ठावांतांनी लावलेले बोर्ड चर्चेचा विषय ठरले. बोर्डच्या माध्यमातून सुस बाणेर आणि पाषाणकरांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काही सवाल केले आहेत.दादा हाच का तुमचा वादा असं म्हणत प्रभाग क्रमांक नऊ मधील नागरिकांनी अजित पवारांना प्रश्न केला आहे. जमीन लाटणाऱ्या व्यक्तीचा तुम्ही प्रचार करणार का ? असा संतप्त सवाल यावेळी मतदारांनी अजित पवार यांना विचारला आहे.दादा तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती.अस म्हणत मतदारांनी आपली नाराजी या पोस्टच्या माध्यमातून उघड केली आहे.

या पोस्टरच्या खाली तुमच्यावर प्रचंड प्रेम करणारे मात्र प्रभाग क्रमांक नऊ मधील अमोल बालवडकर यांना दिलेल्या उमेदवारीमुळे नाराज झालेले सर्व मतदार असं लिहिण्यात आलं आहे. ऐनवेळी बालवडकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन निवडणुकीचे तिकीट दिल्याने परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मधून अमोल बालवडकर यांचे तिकीट निश्चित झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन माजी नगरसेवकांचे देखील तिकीट कापले गेले आहे. त्यामुळे त्यांचे समर्थक देखील प्रचंड नाराज आहे आणि हीच नाराजी कुठेतरी आता पोस्टरच्या माध्यमातून बाहेर निघताना दिसत आहे. त्यामुळे ही खदखद राष्ट्रवादी काँग्रेससाठी घातक मानली जात आहे. याचा फटका निश्चितच निवडणुकीमध्ये बसण्याची शक्यता आहे.


 Give Feedback



 जाहिराती