सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • प्रचारात महापुरुषांपुढे बायका नाचवता, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? ठाकरे गटाचा अमित साटमांवर हल्लाबोल
  • उमेदवारांना पैसे वाटताना मला कोणी भेटलं तर तिथेच बदडून काढणार; खैरेंचा इशारा, बावनकुळेंवरही टीका
  • दिवंगत वडिलांवर भाजपकडून टीका होताच विलासरावांच्या लेकानं ऐकवलं, रितेश देशमुखनं सुनावल्यानंतर रवींद्र चव्हाणांची सपशेल दिलगिरी,
  • मनसेला आणखी एक धक्का, दोघांचा शिवसेनेत प्रवेश; माजी आमदारानेही भाजप सोडली, शिंदेंच्या उपस्थितीत भगवा हाती
  • मोठी बातमी : शिंदेसेनेला बाजूला ठेवून भाजपची काँग्रेससोबत युती, मुंबईच्या वेशीवर देशातील सर्वात मोठी राजकीय घडामोड
 राजकारण

भाजपाच्या शक्तिप्रदर्शनाचा शुभारंभ ! प्रभाग ०९ मध्ये भाजपाच्या अधिकृत उमेदवारांची भव्य पदयात्रा; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

डिजिटल पुणे    05-01-2026 10:58:19

पुणे: पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ जशी जवळ येत आहे, तसतसा प्रभाग क्रमांक ०९ मधील राजकीय वातावरण चांगलाच तापू लागले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत नगरसेवक उमेदवार सौ. रोहिणी सुधीर चिमटे, श्री. गणेश ज्ञानोबा कळमकर, सौ. मयुरी राहुल कोकाटे व श्री. लहू गजानन बालवडकर यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत प्रचाराचा दमदार शुभारंभ केला. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, बाणेर येथून निघालेल्या भव्य पदयात्रेने संपूर्ण प्रभागाचे लक्ष वेधून घेतले.

पक्षाचे झेंडे, घोषणांचा गजर, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि नागरिकांची गर्दी यामुळे संपूर्ण परिसरात निवडणुकीचा जल्लोष पाहायला मिळाला. हनुमान मंदिर, राम मंदिर, भैरवनाथ मंदिर, पुणे महानगरपालिका कचरा शाळा, श्री सावतामाळा मंदिर, बालेवाडी फाटा, श्री गणेश मंदिर ते शिवम बालवडकर संपर्क कार्यालय असा हा प्रचार मार्ग होता.

पदयात्रा जिथे जिथे पोहोचली, तिथे तिथे नागरिकांनी फुलांची उधळण, टाळ्यांचा कडकडाट आणि उत्स्फूर्त घोषणांनी उमेदवारांचे स्वागत केले.यावेळी लहू बालवडकर यांनी सांगितले “हा प्रचार नाही, हा विकासाचा संकल्प आहे. प्रभाग ०९ मध्ये स्वच्छता, पायाभूत सुविधा, पाणी, रस्ते, सुरक्षा आणि सुशासन यासाठी आम्ही ठोस कृती आराखड्यासह मैदानात उतरलो आहोत. आजचा जनसमुदाय आणि नागरिकांचा विश्वास पाहता विजय आमचाच आहे. “

 

या प्रचार यात्रेत भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास आणि संघटनेची ताकद पाहता भाजपाने या प्रभागात निवडणुकीच्या रणधुमाळीत आघाडी घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.“फक्त घोषणा नाहीत, कामाचा अनुभव दिसतो. उमेदवार रस्त्यावर उतरून आमच्याशी बोलत आहेत, हीच खरी लोकशाही आहे. यावेळी आम्ही विकासालाच मत देणार,” अशी प्रतिक्रिया एका स्थानिक नागरिकांनी दिली.दरम्यान, एकीकडे विरोधक अजून रणनीती आखण्यात गुंतलेले असताना, भाजपाने मात्र थेट जनतेत उतरून प्रचाराची आघाडी घेतली आहे. प्रभाग क्रमांक ०९ मध्ये आज झालेल्या या पदयात्रेमुळे निवडणूक लढतीला खरी रंगत आली आहे.


 Give Feedback



 जाहिराती