सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • प्रचारात महापुरुषांपुढे बायका नाचवता, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? ठाकरे गटाचा अमित साटमांवर हल्लाबोल
  • उमेदवारांना पैसे वाटताना मला कोणी भेटलं तर तिथेच बदडून काढणार; खैरेंचा इशारा, बावनकुळेंवरही टीका
  • दिवंगत वडिलांवर भाजपकडून टीका होताच विलासरावांच्या लेकानं ऐकवलं, रितेश देशमुखनं सुनावल्यानंतर रवींद्र चव्हाणांची सपशेल दिलगिरी,
  • मनसेला आणखी एक धक्का, दोघांचा शिवसेनेत प्रवेश; माजी आमदारानेही भाजप सोडली, शिंदेंच्या उपस्थितीत भगवा हाती
  • मोठी बातमी : शिंदेसेनेला बाजूला ठेवून भाजपची काँग्रेससोबत युती, मुंबईच्या वेशीवर देशातील सर्वात मोठी राजकीय घडामोड
 राजकारण

मुंबईत राज-उद्धव ठाकरे एकत्र येऊनही फायदा नाही, भाजपच जिंकणार; देवेंद्र फडणवीसांची ‘मुंबई थिअरी’

डिजिटल पुणे    05-01-2026 12:01:15

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला आजपासून खऱ्या अर्थाने सुरुवात होत आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सोमवारपासून मुंबईत प्रचारसभा घेणार असून भाजप आणि शिंदे गटाविरोधात आक्रमक भूमिका घेणार आहेत. ठाकरे बंधू एकत्र आल्याने मुंबई महापालिकेत शिवसेना-मनसेला मोठा फायदा होईल, असा दावा समर्थकांकडून केला जात असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे.

‘एका मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपची स्पष्ट भूमिका मांडली. “राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यासाठी खूप उशीर झाला आहे. त्यांच्या मतांची ताकद संपल्यानंतर ते एकत्र आले आहेत,” असा टोला त्यांनी लगावला.

“2009 मध्ये एकत्र आले असते तर वेगळा निकाल लागला असता” देवेंद्र फडणवीस म्हणाले,“2009 साली राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले असते तर निकाल वेगळा लागला असता. मात्र आता दोघांचीही मतांची टक्केवारी खूपच कमी आहे. आज ना मराठी माणूस त्यांना मत देईल, ना अमराठी मतदार त्यांच्याकडे वळेल. त्यामुळे त्यांच्या युतीची आम्हाला कोणतीही चिंता नाही. मुंबईत भाजपच निश्चितपणे निवडून येईल.”

“ठाकरेंनी मराठी माणसासाठी नेमकं काय केलं?” – फडणवीसांचा सवाल

मराठी माणसांच्या प्रश्नांवरूनही फडणवीसांनी ठाकरे बंधूंवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.“मराठी माणसाचा सगळ्यात मोठा प्रश्न घराचा आहे. दक्षिण मुंबईत घरांच्या किंमती परवडत नसल्याने मराठी माणूस तिथून हद्दपार झाला. शिवसेनेची सत्ता असताना ठाकरेंनी मराठी माणसांसाठी एकतरी घरांचा प्रकल्प केला का?” असा सवाल त्यांनी केला.

“बीडीडी चाळीच्या पुनर्विकासातून 80 हजार मराठी कुटुंबांना दिलासा”

फडणवीस म्हणाले,“आम्ही बीडीडी चाळींचा पुनर्विकास करून सुमारे 80 हजार मराठी नागरिकांना मुंबईतून हद्दपार होण्यापासून वाचवलं. हा प्रकल्प खासगी बिल्डरला दिला नाही, तर म्हाडाच्याच माध्यमातून राबवला. ठाकरेंनी फक्त मोर्चे काढले; मोर्च्यांनी पोट भरत नाही.”

“ठाकरे बंधूंच्या युतीची भाजपला चिंता नाही”

ठाकरे बंधू एकत्र आल्याने मुंबईतील राजकीय समीकरणे बदलतील, असा दावा होत असतानाच, “त्यांच्या युतीचा भाजपवर कोणताही परिणाम होणार नाही,” असा ठाम विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.


 Give Feedback



 जाहिराती