सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • प्रचारात महापुरुषांपुढे बायका नाचवता, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? ठाकरे गटाचा अमित साटमांवर हल्लाबोल
  • उमेदवारांना पैसे वाटताना मला कोणी भेटलं तर तिथेच बदडून काढणार; खैरेंचा इशारा, बावनकुळेंवरही टीका
  • दिवंगत वडिलांवर भाजपकडून टीका होताच विलासरावांच्या लेकानं ऐकवलं, रितेश देशमुखनं सुनावल्यानंतर रवींद्र चव्हाणांची सपशेल दिलगिरी,
  • मनसेला आणखी एक धक्का, दोघांचा शिवसेनेत प्रवेश; माजी आमदारानेही भाजप सोडली, शिंदेंच्या उपस्थितीत भगवा हाती
  • मोठी बातमी : शिंदेसेनेला बाजूला ठेवून भाजपची काँग्रेससोबत युती, मुंबईच्या वेशीवर देशातील सर्वात मोठी राजकीय घडामोड
 राजकारण

मोठी बातमी : नारायण राणेंना भोवळ, भाषण थांबवलं; कालच दिले राजकीय निवृत्तीचे संकेत

डिजिटल पुणे    05-01-2026 14:59:35

चिपळूण: भाजप नेते, माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांना चिपळूणमधील कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमादरम्यान भोवळ आल्याने एकच धावपळ उडाली. भाषणाच्या अखेरच्या टप्प्यात त्यांचा आवाज बसला असून, चक्कर येत असल्याची तक्रार करत त्यांनी भाषण आटोपते घेतले. प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे राणेंनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला आणि कार्यक्रमस्थळावरून थेट गेस्ट हाऊसकडे रवाना झाले. यावेळी त्यांच्यासोबत मोठा बंदोबस्त होता, तर अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रकृतीची काळजी घेतली.

विशेष म्हणजे, याच घटनेच्या एक दिवस आधी नारायण राणेंनी सार्वजनिक भाषणात राजकीय निवृत्तीचे संकेत दिले होते. “वय झालंय, आता थांबायला हवं,” असे सांगत त्यांनी दोन्ही मुले राजकारणात स्थिरावली असल्याचे नमूद केले. उद्योग सांभाळण्यासाठीही कुणीतरी आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी राजकारणातून बाजूला होण्याचा विचार व्यक्त केला होता.

दरम्यान, सिंधुदुर्गातील सभेत बोलताना राणे म्हणाले होते, “आजही नारायण राणे रस्त्यावर भाजी घेतो. काही जण हातात अंगठ्या, काळ्या काचेच्या गाड्या घेऊन फिरतात, पण माझ्या गाडीला काळ्या काचा नाहीत. माणुसकी हा माझा धर्म आहे. राजकारणात कटकारस्थानं होतात, अडचणी येतात. त्यामुळे आता ठरवलंय—घरी बसायचं. मुलांना सांगेन, नांदा सौख्य भरे… चांगल्याला जोपासा.”काल दिलेले राजकीय निवृत्तीचे संकेत आणि आजची प्रकृतीची घटना यामुळे राणेंच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत चर्चांना वेग आला आहे.


 Give Feedback



 जाहिराती