सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • प्रचारात महापुरुषांपुढे बायका नाचवता, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? ठाकरे गटाचा अमित साटमांवर हल्लाबोल
  • उमेदवारांना पैसे वाटताना मला कोणी भेटलं तर तिथेच बदडून काढणार; खैरेंचा इशारा, बावनकुळेंवरही टीका
  • दिवंगत वडिलांवर भाजपकडून टीका होताच विलासरावांच्या लेकानं ऐकवलं, रितेश देशमुखनं सुनावल्यानंतर रवींद्र चव्हाणांची सपशेल दिलगिरी,
  • मनसेला आणखी एक धक्का, दोघांचा शिवसेनेत प्रवेश; माजी आमदारानेही भाजप सोडली, शिंदेंच्या उपस्थितीत भगवा हाती
  • मोठी बातमी : शिंदेसेनेला बाजूला ठेवून भाजपची काँग्रेससोबत युती, मुंबईच्या वेशीवर देशातील सर्वात मोठी राजकीय घडामोड
 राजकारण

पुण्यात बीडकर–धंगेकर लढतीत अजितदादांच्या उमेदवाराची एन्ट्री; नवथरेंमुळे धंगेकरांना फटका बसणार?

डिजिटल पुणे    05-01-2026 16:59:54

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक २४ मध्ये पुन्हा एकदा बीडकर–धंगेकर लढत पाहायला मिळणार आहे. मात्र यावेळी ही लढत केवळ दुहेरी न राहता तिरंगी होण्याची चिन्हे आहेत. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने गणेश नवथरे यांना उमेदवारी दिल्याने या प्रभागातील राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत.

२०१७ च्या निवडणुकीत रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे गणेश बीडकर यांचा पराभव केला होता. यंदाच्या निवडणुकीत भाजपकडून पुन्हा गणेश बीडकर मैदानात असून, शिवसेनेकडून रवींद्र धंगेकर यांचा मुलगा प्रणव धंगेकर रिंगणात आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून गणेश नवथरे यांची एन्ट्री झाल्याने या प्रभागात तिरंगी लढत निश्चित मानली जात आहे.

या प्रभागात भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. गणेश बीडकर यांची उमेदवारी भाजपकडून जवळपास निश्चित होती. तर महायुतीतून उमेदवारी मिळावी यासाठी धंगेकरांनी प्रयत्न केले होते. मात्र हे गणित जुळले नाही. अखेर भाजप आणि शिवसेना वेगवेगळे लढण्याच्या तयारीत उतरले.

दरम्यान, अजित पवार गटाने ग्राऊंड लेव्हलची चाचपणी करत कसबा गणपती, कमला नेहरू हॉस्पिटल आणि K.E.M. हॉस्पिटल परिसरात सक्रिय असलेले गणेश नवथरे यांना उमेदवारी दिली. नवथरे यांचा जनसंपर्क मजबूत असल्याचे सांगितले जाते.

नवथरेंमुळे प्रणव धंगेकरांना धोका?

राजकीयदृष्ट्या महत्त्वाची बाब म्हणजे गणेश नवथरे हे रवींद्र धंगेकरांचे अतिशय जवळचे मानले जात होते. धंगेकरांनी यापूर्वी लढवलेल्या निवडणुकांमध्ये नवथरे सक्रिय होते आणि संघटनात्मक जबाबदाऱ्या सांभाळत होते. त्यामुळे आता धंगेकरांना भाजपपेक्षा जास्त धोका त्यांच्या माजी सहकाऱ्याकडून असल्याची चर्चा आहे.

नवथरेंच्या उमेदवारीमुळे कार्यकर्ते आणि स्थानिक यंत्रणा विभागली जाण्याची शक्यता असून, त्याचा थेट परिणाम प्रणव धंगेकरांच्या मतांवर होऊ शकतो, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे. प्रभाग क्रमांक २४ मधील ही तिरंगी लढत पुण्यातील सर्वाधिक लक्षवेधी लढतींपैकी एक ठरणार, हे मात्र निश्चित.


 Give Feedback



 जाहिराती