सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पालिकेत मोजक्याच लोकांना टेंडर दिलं जात, अजित पवारांचा हल्लाबोल, पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी एक अलार्म पाच काम कॅंपेन सुरु
  • 'उमेदवारी मागे घे, मी कुठल्या पदावर माहितीये ना, मुख्यमंत्र्यालाही मी बोलवल्यावर यावं लागतं'; राहुल नार्वेकरांवर धमकावल्याचा आरोप
  • सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी
  • आधी स्वतःच्या लेकाचा पराक्रम पाहा; भ्रष्टाचार लपवण्यासाठीच भाजपमध्ये आलात – महेश लांडगेंचे अजित पवारांना खुले आव्हान
  • फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
 राजकारण

बाणेरमध्ये भाजपचा ‘सोसायटी टू सोसायटी’ प्रचार; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

डिजिटल पुणे    06-01-2026 12:33:48

पुणे : आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मधील बाणेर परिसर सध्या भाजपच्या प्रचाराचा केंद्रबिंदू ठरत आहे. भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार सौ. रोहिणी सुधीर चिमटे, श्री. गणेश जानोबा कळमकर, सौ. मयुरी राहुल कोकाटे व श्री. लहू गजानन बालवडकर यांनी बाणेरमधील प्रमुख गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सलग भेटी देत नियोजनबद्ध, थेट आणि परिणामकारक प्रचार मोहिमेला वेग दिला आहे.सुप्रीम एस्ताडो, सन हॉरायझन, एस्टोनिया, अंजोर को-ऑप हाउसिंग, पार्क एक्सप्रेस आणि एसेन्सिया हाइट्स या नामांकित सोसायट्यांमध्ये झालेल्या संवाद दौर्‍यांमुळे बाणेरमध्ये भाजपच्या निवडणूक प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे. केवळ औपचारिक भेटी न करता, उमेदवारांनी थेट नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचनांवर सविस्तर चर्चा केल्याने प्रचाराला वेगळी धार मिळाल्याचे चित्र आहे.

रस्ते, पाणीपुरवठा, वाहतूक, सुरक्षितता, स्वच्छता आणि नागरी सुविधा यांसारख्या दैनंदिन ज्वलंत मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडत भाजपच्या विकासाभिमुख धोरणाचा मॅप नागरिकांसमोर ठेवण्यात आला. विशेष म्हणजे, अनेक ठिकाणी नागरिकांनी थेट अपेक्षा मांडत निवडणुकीत सक्रिय सहभाग आणि पाठिंबा देण्याची ग्वाही दिली. उमेदवारांकडूनही समस्या सोडवण्यासाठी पारदर्शक, वेळबद्ध आणि जबाबदार कारभाराचे आश्वासन देण्यात आले. या संवादातून भाजपचा प्रचार केवळ राजकीय न राहता विश्वासार्ह आणि लोककेंद्री ठरत असल्याचे स्पष्ट झाले.

बाणेरमधील या सलग प्रचार दौर्‍यांमुळे प्रभाग क्रमांक ९ मध्ये भाजपची संघटनात्मक ताकद, नियोजन आणि जनाधार अधिक मजबूत होत असल्याचे संकेत मिळत आहेत. वाढता नागरिक सहभाग, सकारात्मक प्रतिसाद आणि आक्रमक प्रचारयंत्रणा पाहता, बाणेरमधील ही घडामोड निवडणूक गणित बदलणारी ठरू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.एकूणच, ‘कमळ’ चिन्हाभोवती मतदारांचे वाढते ध्रुवीकरण आणि प्रचार फेऱ्या प्रभाग ९ मधील निवडणूक लढतीला निर्णायक वळण देणार असल्याचे चित्र सध्या स्पष्टपणे दिसून येत आहे.


 Give Feedback



 जाहिराती