पुणे : गैयाफ्लक्स इनोवेशन प्रायव्हेट लिमिटेड ने तयार केलेल्या करिअरग्राम या ऑनलाइन पोर्टलचे उद्घाटन ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे शास्त्रीय सल्लागार डॉ. शरद काळे यांच्या हस्ते ६ जानेवारी २०२६ रोजी झाले. प्रमुख पाहुण्या म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा जात वैधता समितीच्या अध्यक्षा व अतिरिक्त जिल्हाधिकारी सौ. समीक्षा गोकुले या उपस्थित होत्या . अध्यक्षस्थानी गैयाफ्लक्स इनोवेशन प्रा. लि. चे सहसंस्थापक आणि संचालक प्रा. डॉ. दीपक ताटपुजे होते.
मावळ भूषण मामासाहेब खांडगे सभागृह, तळेगाव दाभाडे (पुणे) येथे झालेला हा कार्यक्रम स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल आणि रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे (एमआयडीसी) यांचे सहकार्याने आयोजित करण्यात आला होता.करिअर ग्राम पोर्टलवर विद्यार्थ्यांना शास्त्रीय दृष्ट्या करिअर प्लॅनिंग, करिअर मॅपिंग, अभ्यासक्रमांची निवड अशा अनेक शिक्षण शाखा निवडी बाबत तद्य व्यक्ती अद्ययावत तंत्रज्ञानासह ऑनलाइन द्वारे मार्गदर्शन करणार आहेत.'करियर नियोजन करताना कौशल्य निवडीच्या आधारावर करियर नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे', असे प्रतिपादन डॉ. शरद काळे यांनी प्रतिपादन केले.
कार्यक्रमाला रजनीगंधा खांडगे, मोहिनी शर्मा, संदीप मगर, उद्योजिका रूपाली काकडे, मोहित राठोड, डॉ. प्रमोद बोराडे, उद्योजक मनोज ढमाले तसेच शिक्षण क्षेत्रातील डॉ. अविनाश काकडे, प्रा. हर्षद गुणे, आणि मुख्याध्यापिका रेणु शर्मा आदी मान्यवर आणि शाळेतील शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. नमन शर्मा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तसेच व्यवस्थापकीय संचालक मोहिनी शर्मा यांनी आभार मानले.