पुणे : भारती विद्यापीठाच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट’ (आयएमईडी)च्या वतीने राष्ट्रीय पातळीवरील ‘डॉ.पतंगराव कदम वक्तृत्व स्पर्धा -२०२६’ चे दिनांक ९ जानेवारी २०२६ रोजी आयएमईडी, एरंडवणे येथे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी साडे नऊ वाजता स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती आयएमईडीचे संचालक डॉ. श्रवण कडवेकर यांनी दिली.या स्पर्धेचे हे बारावें वर्ष आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी या तीन भाषांमध्ये,कनिष्ठ महाविद्यालय -वरिष्ठ महाविद्यालय अशा दोन गटांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. दोन्ही गटातील विजेत्याना स्वतंत्र पारितोषिके देण्यात येणार आहेत.प्रथम क्रमांकास रुपये १५ हजार रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक, द्वितीय क्रमांकास रुपये १२ हजार रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक, तृतीय क्रमांकास १० हजार रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक असे पारितोषिकांचे स्वरूप आहे.डॉ. आर. व्ही. महाडिक(उपसंचालक , आय एम ई डी), डॉ. हेमा मिरजी, डॉ. विजय फाळके, डॉ. प्रमोद पवार यांच्यासह संयोजन समिती सदस्य स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कार्यरत आहेत.