सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं, सूर्य-चंद्र असेपर्यंत मी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं होऊ देणार नाही
  • राज ठाकरेंनी सांगितला मुंबईचा चेहरामोहरा बदलण्याचा भविष्यातील धडकी भरवणारा प्लॅन
 जिल्हा

समृद्धी महामार्गावर गॅन्ट्री उभारणीसाठी पाच दिवस वाहतुकीत बदल

डिजिटल पुणे    08-01-2026 15:24:31

अमरावती  : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी महत्त्वाची सूचना देण्यात येत आहे की, अमरावती जिल्ह्यातील महामार्गाच्या पट्ट्यात ९ जानेवारी ते १३ जानेवारी २०२६ या पाच दिवसांच्या कालावधीत वाहतूक तात्पुरती थांबवण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत ‘हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम हाती घेण्यात आले असून, हे काम एकूण १० टप्प्यांत पूर्ण केले जाणार आहे.

जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्यातून जाणाऱ्या कि.मी. ९०+५०० ते  कि.मी. १५०+३०० या दरम्यान ही गॅन्ट्री उभारली जाणार आहे. या कामाच्या प्रत्येक टप्प्यादरम्यान संबंधित वाहिनीवरील वाहतूक ४५ ते ६० मिनिटांसाठी पूर्णतः बंद ठेवली जाईल. प्रत्येक टप्प्यातील काम पूर्ण झाल्यानंतर त्या वाहिनीवरील वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्यात येईल. या तांत्रिक कामामुळे प्रवाशांचा काही काळ खोळंबा होण्याची शक्यता असल्याने, प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन वेळेनुसार करावे आणि महामार्गावरील कर्मचाऱ्यांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


 Give Feedback



 जाहिराती