सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • आम्ही भाजपचे बाप, वेळ आली तर काँग्रेसला सत्ता देऊ पण भाजपची जिरवू; महादेव जानकर कडाडले
  • मोठी बातमी! काँग्रेसचे 10 नगरसेवक फोडणाऱ्या भाजपला शिंदेंच्या शिवसेनेचा झटका, अंबरनाथमध्ये राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करणार
  • : देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं, सूर्य-चंद्र असेपर्यंत मी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं होऊ देणार नाही
  • राज ठाकरेंनी सांगितला मुंबईचा चेहरामोहरा बदलण्याचा भविष्यातील धडकी भरवणारा प्लॅन
 राजकारण

पिंपरी चिंचवडमधील प्रभाग २५ मध्ये मयूर कलाटे यांचा वैयक्तिक संवादावर भर

अजिंक्य स्वामी    09-01-2026 15:16:54

वाकड (पिंपरी चिंचवड): पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २५ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मयूर पांडुरंग कलाटे यांनी प्रचाराची दिशा स्पष्ट करत वैयक्तिक संपर्क, प्रत्यक्ष संवाद आणि नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यावर भर दिला आहे. पारंपरिक सभांपेक्षा घराघरांत जाऊन नागरिकांशी थेट चर्चा करण्याचा त्यांचा प्रयत्न सध्या प्रभागात विशेष लक्ष वेधून घेत आहे.प्रभागातील विविध वस्ती, सोसायट्या आणि अंतर्गत भागांमध्ये मयूर कलाटे स्वतः उपस्थित राहून नागरिकांच्या भेटी घेत आहेत. या भेटींमध्ये पाणीपुरवठा, रस्ते, वाहतूक, कचरा व्यवस्थापन, आरोग्य सुविधा, तसेच मूलभूत नागरी सुविधांबाबत नागरिक आपले प्रश्न आणि अपेक्षा मांडताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, नागरिकांकडून मिळणारा आपुलकीचा प्रतिसाद आणि सकारात्मक अभिप्राय यामुळे प्रचाराला वेगळीच उर्जा मिळत असल्याचे चित्र आहे.

 

 

“विकासाचा विश्वास; जनतेचा आशीर्वाद!” हा संदेश केवळ घोषवाक्यापुरता न ठेवता, तो प्रत्यक्ष कृतीतून दिसावा, यासाठी मयूर कलाटे प्रयत्नशील आहेत. नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहणे हीच आपली भूमिका असल्याचे ते सांगतात. आजवर केलेल्या कामांची पोचपावती म्हणून मिळणारा जनतेचा आशीर्वाद हा पुढील विकासासाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.दरम्यान, प्रभाग क्रमांक २५ साठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चारही विभागांमध्ये सक्षम उमेदवार दिले असून, संघटितपणे प्रचार राबवला जात आहे. पक्षाचे अधिकृत उमेदवार पुढीलप्रमाणे—

२५ (अ): वाघमारे विक्रम भास्कर

२५ (ब): दर्शले रेखा राजेश

२५ (क): पवार चित्रा संदीप

२५ (ड): कलाटे मयूर पांडुरंग

 

चारही उमेदवारांनी समन्वयाने प्रभागातील प्रश्नांना प्राधान्य देत विकासाभिमुख अजेंडा मांडला आहे. स्थानिक पातळीवर विश्वास, पारदर्शकता आणि कामाच्या आधारे मतदारांशी नाते निर्माण करण्यावर भर दिला जात असून, त्याचा सकारात्मक परिणाम प्रभागात दिसून येत आहे.निवडणुकीच्या अंतिम टप्प्याकडे वाटचाल सुरू असताना, वैयक्तिक भेटी, संवाद आणि जनतेशी थेट जोडलेपण हेच या प्रचाराचे प्रमुख वैशिष्ट्य ठरत आहे. नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहता, प्रभाग क्रमांक २५ मध्ये निवडणूक लढत अधिकच रंगतदार होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

 

 

 


 Give Feedback



 जाहिराती