पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ०९ मध्ये मोठी राजकीय उलथापालथ पाहायला पाहायला मिळाली. गेल्याच आठवड्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे बंडखोर उमेदवार महेश सुतार यांनी चंद्रकांत पाटलांच्या निवास्थानी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यानंतर भाजपच्या ‘जनसंवाद’ पदयात्रेचे जोरदार स्वागत केल्याने सुतारवाडीतील राजकीय वातावरण पूर्णतः ढवळून निघाले आहे. स्वराज्य चौक येथून सुरू झालेल्या या पदयात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. पदयात्रेच्या मार्गावर पूर्वाश्रमीच्या शिवसेनेच्या उभाठा कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजी, जल्लोष आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे संपूर्ण परिसर राजकीय रंगात रंगून गेला.
या वेळी महेश सुतार यांनी भाजपच्या अधिकृत उमेदवार सौ. रोहिणीताई चिमटे, श्री. गणेश कळमकर, सौ. मयुरीताई कोकाटे तसेच श्री. लहू बालवडकर यांचे भल्या मोठ्या हाराने जाहीर स्वागत केले. यावेळी त्यांनी भाजपच्या पदयात्रेचे केलेले जोरदार स्वागताने भाजपच्या प्रचाराला मोठे बळ मिळाल्याचे स्पष्ट झाले. महेश सुतार यांच्या या भूमिकेमुळे प्रभाग क्रमांक ०९ मधील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत असून, भाजपची ताकद लक्षणीयरीत्या वाढल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
प्रभाग क्रमांक ०९ मधील सुतारवाडी परिसरात महेश सुतार हे नाव पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. सुतारवाडीत त्यांची वैयक्तिक राजकीय पकड आणि जनाधार आजही भक्कम असल्याचे अलीकडील घडामोडींमधून स्पष्ट झाले आहे.
भाजपच्या ‘जनसंवाद’ पदयात्रेदरम्यान महेश सुतार यांनी पदयात्रेचे केलेले जोरदार स्वागत हे केवळ प्रतीकात्मक नव्हते. या घटनेतून सुतारवाडीत त्यांचा प्रभाव, कार्यकर्त्यांचे जाळे आणि स्थानिक पातळीवरील नेतृत्वाची क्षमता पुन्हा अधोरेखित झाली आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे पदयात्रेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा त्यांच्या राजकीय ताकदीचा ठळक पुरावा मानला जात आहे.
सुतारवाडीतील अनेक भागांत महेश सुतार यांनी पूर्वी केलेल्या स्थानिक कामांचा आणि थेट जनसंपर्काचा आजही परिणाम दिसून येतो. विशेषतः युवक, स्थानिक व्यावसायिक आणि काही प्रभावी मतदार गटांमध्ये त्यांचा प्रभाव कायम असल्याचे चित्र आहे. त्यामुळेच त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्यानंतर प्रभाग क्रमांक ०९ मधील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलताना दिसत आहेत.
राजकीय विश्लेषकांच्या मते, महेश सुतार यांची ताकद ही केवळ मतांच्या संख्येपुरती मर्यादित नसून, ती मतांचे ध्रुवीकरण करण्याची क्षमता ठेवणारी आहे. त्यांच्या भूमिकेमुळे भाजपच्या प्रचाराला अतिरिक्त बळ मिळाले असून, विरोधी गटांसाठी ही बाब निश्चितच चिंतेची ठरत आहे.
