सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्यात महिला उमेदवाराकडून खास महिलांसाठीचा जाहीरनामा प्रकाशित
  • गाडीच्या टपावर चढून चंद्रकांत पाटील यांनी केले भाषण, पुण्यातील प्रचार फेरी दरम्यानचा व्हिडिओ व्हायरल
  • बारावीचे हॉल तिकीट उद्यापासून मिळणार;इयत्ता बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची हॉल तिकिटे ऑनलाईन पद्धतीने मिळणार ;संबंधित शाळा व ज्युनिअर कॉलेज यांनी हॉल तिकिटांचे प्रिंट आऊट काढून विद्यार्थ्यांना वितरित करावी, राज्य मंडळाची सूचना
  • पुणे शहरातील ७०६ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज नाशिकमधे जाहीर सभा
  • मोठी बातमी: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न? बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ
 शहर

भारती विद्यापीठ मध्ये आंतरराष्ट्रीय प्राध्यापक विकास कार्यक्रम ; फिनलंडचे कॉन्सुल जनरल एरिक हॉलस्ट्रॉम यांच्या हस्ते उद्घाटन

डिजिटल पुणे    10-01-2026 17:39:30

पुणे : भारती अभिमत विद्यापीठचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग(पुणे) येथे 'रिसेन्ट ट्रेंड्स इन आयटी,एआय,हेल्थकेअर,जनरेटिव्ह एआय,एक्सप्लेनेबल एआय'  या विषयांवर आधारित पाच दिवसीय आंतरराष्ट्रीय प्राध्यापक विकास कार्यक्रम (फॅकल्टी डेव्हलपमेन्ट प्रोग्रॅम) दि. १० जानेवारी २०२६ रोजी सुरू झाला. या एफडीपीमध्ये भारत आणि फिनलंडमधील शैक्षणिक सहकार्य, तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित नव्या संशोधन आणि नवोपक्रम केंद्रांना विशेष भर  देण्यात आला आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन फिनलंडचे भारतातील कॉन्सुल जनरल  एरिक हॉलस्ट्रॉम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी फ्लॉ एपीआयस प्रा.लि.आणि भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या माहिती तंत्रज्ञान विभागामधील सामंजस्य कराराअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या 'फ्लॉ एआय इनोव्हेशन अँड रिसर्च लॅब  चे उद्घाटनही करण्यात आले. या प्रयोगशाळेमुळे विद्यार्थी, संशोधक आणि उद्योग यांच्यातील सहकार्याला चालना मिळणार आहे.

उद्घाटनप्रसंगी भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विवेक सावजी, प्राचार्य डॉ. राजेश प्रसाद, उपप्राचार्या डॉ. सुनीता जाधव, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संकुलाचे अधिष्ठाता डॉ. सुहास पाटील, लष्करी अभियंता सेवा विभागाचे संयुक्त महासंचालक उमेश कुमार, एआय संशोधक रिदम भाटिया, फ्लॉ एपीआयस प्रा.लि.   चे सहसंस्थापक अनिश कुमार सिंग आणि प्रखर कुमार सिंग, डॉ. मिलिंद गायकवाड,डॉ.प्रमोद जाधव, डॉ. रोहिणी जाधव तसेच विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक, उद्योग क्षेत्रातील मान्यवर आणि विद्यार्थी उपस्थित होते.

एरिक हॉलस्ट्रॉम यांनी भारत आणि फिनलंडमधील वाढते शैक्षणिक, व्यावसायिक आणि सांस्कृतिक संबंध अधोरेखित केले. डिजिटल कौशल्ये, आजीवन शिक्षण आणि मानवकेंद्रित, नियमाधारित प्रशासन यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रगतीसोबत मानवी मूल्ये जपली गेली पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.

कुलगुरू डॉ. विवेक सावजी यांनी वेगाने बदलणाऱ्या एआय युगात प्राध्यापकांनी सातत्याने कौशल्यवृद्धी करणे आणि विद्यार्थ्यांसोबत सहअभ्यास करणे आवश्यक असल्याचे नमूद केले. नव्या लॅब च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कल्पनांना प्रत्यक्ष उपायांमध्ये रूपांतर करण्यावर भर देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

प्राचार्य डॉ. राजेश प्रसाद यांनी संस्थेतील संशोधन व नवोपक्रम संस्कृती, अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि पीएचडीधारक प्राध्यापकांचे योगदान अधोरेखित केले. भारतीय आणि फिनिश शिक्षण व्यवस्थांमधील नवोपक्रमाधारित दृष्टिकोन समान असल्याचे त्यांनी नमूद केले.

एफडीपी समन्वयक डॉ. मिलिंद गायकवाड यांनी माहिती तंत्रज्ञान विभागाची ओळख दिली. डॉ. अमोल कदम यांनी सीएसबीएस  विभागाची ओळख करून दिली. सहसमन्वयक डॉ. रोहिणी जाधव यांनी सांगितले की, या पाच दिवसीय एफडीपीमध्ये आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली एआय, डेटा सायन्स, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, संशोधनाभिमुखता आणि आजीवन शिक्षण यांवर सखोल चर्चा होणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती