सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्यात महिला उमेदवाराकडून खास महिलांसाठीचा जाहीरनामा प्रकाशित
  • गाडीच्या टपावर चढून चंद्रकांत पाटील यांनी केले भाषण, पुण्यातील प्रचार फेरी दरम्यानचा व्हिडिओ व्हायरल
  • बारावीचे हॉल तिकीट उद्यापासून मिळणार;इयत्ता बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची हॉल तिकिटे ऑनलाईन पद्धतीने मिळणार ;संबंधित शाळा व ज्युनिअर कॉलेज यांनी हॉल तिकिटांचे प्रिंट आऊट काढून विद्यार्थ्यांना वितरित करावी, राज्य मंडळाची सूचना
  • पुणे शहरातील ७०६ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज नाशिकमधे जाहीर सभा
  • मोठी बातमी: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न? बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ
 शहर

प्रचाराच्या धामधुमीतही राघवेंद्र बाप्पू मानकरांचे स्वच्छतेकडे लक्ष; ‘मिशन स्वच्छ प्रभाग २५’ चा घेतला आढावा…

डिजिटल पुणे    10-01-2026 18:35:06

पुणे : स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा मोहिमेला बळ म्हणून, आमदार हेमंत रासने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग २५ शनिवार पेठ महात्मा फुले मंडई भागात सुरू असलेले ‘मिशन स्वच्छ प्रभाग २५’ अविरतपणे सुरू असल्याची माहिती राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी दिली.प्रभागातील स्वच्छतेविषयक गरज लक्षात घेऊन सुरू करण्यात आलेले ‘मिशन स्वच्छ प्रभाग २५’ चा बाप्पु मानकर यांनी प्रचाराच्या धामधुमीतही नियमित आढावा घेतला. नागरिकांकडून प्राप्त होत असलेल्या अस्वच्छतेविषयक तक्रारी त्यांचे निराकरण, लागणारा वेळ याबाबत त्यांनी माहिती घेतली. तसेच स्वच्छता सेवकांच्या आरोग्याची विचारपूस केली. निवडणुकीची घोषणा झाल्यावरही निवडणूक आयोगाच्या नियमांच्या अधीन राहून हे अभियान सुरू ठेवण्यात आले आहे.

“निवडणूक आली की हे अभियान बंद होईल असे वाटले होते. मात्र, आमच्या शनिवार पेठ भागात आज पाचव्या वेळेस ‘मिशन स्वच्छ प्रभाग २५’ टीम स्वच्छता करत आहे. यासारखे अभियान नियमितपणे राबविले जाईल अशी ग्वाही आम्हाला बाप्पु मानकर यांनी दिली आहे.”- जयेश पंडित, नागरिक

“मिशन स्वच्छ प्रभागच्या २५ माध्यमातून अनेक रस्ते व अरुंद गल्ल्या स्वच्छ करून घेण्यात आल्या. मिशनच्या सुरुवातीला कचऱ्याची विल्हेवाट लागावी यासाठी डस्ट बिनचे वाटप करण्यात आले. आजवर ८० टन कचरा उचलण्यात आला आहे.”


 Give Feedback



 जाहिराती