सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्यात महिला उमेदवाराकडून खास महिलांसाठीचा जाहीरनामा प्रकाशित
  • गाडीच्या टपावर चढून चंद्रकांत पाटील यांनी केले भाषण, पुण्यातील प्रचार फेरी दरम्यानचा व्हिडिओ व्हायरल
  • बारावीचे हॉल तिकीट उद्यापासून मिळणार;इयत्ता बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची हॉल तिकिटे ऑनलाईन पद्धतीने मिळणार ;संबंधित शाळा व ज्युनिअर कॉलेज यांनी हॉल तिकिटांचे प्रिंट आऊट काढून विद्यार्थ्यांना वितरित करावी, राज्य मंडळाची सूचना
  • पुणे शहरातील ७०६ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज नाशिकमधे जाहीर सभा
  • मोठी बातमी: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न? बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ
 जिल्हा

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे उरण तालुका – नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांची घेतली सदिच्छा भेट.

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी)    10-01-2026 18:37:50

उरण : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची अंगीकृत संघटना असलेल्या शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष उरण तालुक्यातील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी मनोहरशेठ भोईर (रायगड जिल्हाप्रमुख व माजी आमदार)यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले.या भेटीवेळी जिल्हा कार्यालयीन चिटणीस ओमकार विजय घरत, कक्ष उरण तालुका संघटक कुणाल अशोक पाटील, कक्ष उरण शहर प्रमुख संदीप जाधव तसेच इतर सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी उपस्थित होते. या सर्व पदाधिकाऱ्यांचे माजी आमदार मनोहरशेठ भोईर, उरण तालुकाप्रमुख  संतोष ठाकूर, माजी नगराध्यक्ष  गणेश शिंदे आणि नगरपालिकेतील गटनेते अतुल ठाकूर यांनी मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.ओमकार विजय घरत – कक्ष जिल्हा कार्यालय चिटणीस, रायगड,कुणाल अशोक पाटील – कक्ष तालुका संघटक उरण,संदीप जाधव – कक्ष उरण शहर प्रमुख, उरण, फतेह खान – शहर उपकक्ष प्रमुख उरण,आकाश तेलंगे – शहर उपकक्ष प्रमुख, उरण,सचिन कदम – कक्ष कामठा विभाग प्रमुख, कामठा, तेजस म्हात्रे – द्रोणगिरी शहर प्रमुख, द्रोणगिरी, संदेश पाटील – द्रोणगिरी उपशहर प्रमुख, द्रोणगिरी, सायरस डिसूझा – जिल्हा परिषद कक्ष प्रमुख, चाणजे,अमित पाटील – नवघर जिल्हा परिषद कक्ष प्रमुख, नवघर,हृतिक पाटील – नागाव पंचायत समिती कक्ष प्रमुख, नागाव, रोशन पाटील – केळवणे जिल्हा परिषद कक्ष प्रमुख, केळवणे,चेतन माळी – जिल्हा उपकक्ष प्रमुख, चाणजे आदी नवनिर्वाचित पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.ही भेट उरण तालुक्यात ग्राहक हक्कांसाठी प्रभावी कार्य आणि संघटनात्मक बळकटीसाठी महत्त्वपूर्ण ठरली.


 Give Feedback



 जाहिराती