सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • नवी मुंबई विमानतळास दि.बा.पाटलांचं नाही, नरेंद्र मोदींचं नाव द्यायचंय, काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप
  • निवडणूक आयोगानं सांगितलं तर लाडक्या बहिणींचे पैसे 16 तारखेला देणार, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
  • पुण्यात महिला उमेदवाराकडून खास महिलांसाठीचा जाहीरनामा प्रकाशित
  • गाडीच्या टपावर चढून चंद्रकांत पाटील यांनी केले भाषण, पुण्यातील प्रचार फेरी दरम्यानचा व्हिडिओ व्हायरल
  • बारावीचे हॉल तिकीट उद्यापासून मिळणार;इयत्ता बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची हॉल तिकिटे ऑनलाईन पद्धतीने मिळणार ;संबंधित शाळा व ज्युनिअर कॉलेज यांनी हॉल तिकिटांचे प्रिंट आऊट काढून विद्यार्थ्यांना वितरित करावी, राज्य मंडळाची सूचना
  • मोठी बातमी: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न? बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ
 राजकारण

निवडणूक आयोग सांगेल तर लाडक्या बहिणींचे पैसे 16 तारखेला देऊ – अजित पवार

डिजिटल पुणे    11-01-2026 18:32:07

पुणे: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा राजकारणाच्या केंद्रस्थानी आली आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या योजनेच्या हप्त्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

अजित पवार म्हणाले, “निवडणूक आयोगाने सांगितले तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता 16 तारखेला देऊ.” काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र लिहून 14 जानेवारीनंतर हप्ता द्यावा अशी मागणी केल्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, भाजप नेते गिरीश महाजन आणि मुंबईतील भाजप उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांनी मकर संक्रांतीपूर्वी डिसेंबर आणि जानेवारीचे हप्ते एकत्र म्हणजेच 3000 रुपये मिळणार असल्याचे सोशल मीडियावर पोस्टद्वारे सांगितले होते. यानंतर काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवला होता.

‘केजीएफ पाहतो, मग ठरवतो’

रोहित पवार यांनी अजित पवारांचा उल्लेख ‘रॉकी भाई’ असा केल्यावर अजित पवारांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली. “मी केजीएफ पाहिलेला नाही. आधी केजीएफ पाहतो, मग ठरवतो की रोहितने मला रॉकी भाई म्हटले ते योग्य की अयोग्य,” असं ते म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर

महापालिका निवडणुकांबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, “मी इथे महापालिका लढवतोय. इथल्या चुका दाखवल्या म्हणजे युती धर्म पाळला नाही असं होतं का?” तसेच “9 वर्ष निवडणूक झाली नाही तर कंठ कसा फुटणार?” असा टोला त्यांनी लगावला.

महेश लांडगे यांच्याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, “तो खूप मोठा आहे, स्वयंपूर्ण आहे. त्याचा बोलवता धनी कोणी नाही. भोसरीमधली लोक स्वयंभू असतात.”दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमधील सभेत “जोपर्यंत देवभाऊ मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही” असं स्पष्ट केलं. पुढे बोलताना त्यांनी लखपती दीदी संकल्पनेवर भर देत, “50 लाख लखपती दीदी झाल्यानंतर येत्या काळात 1 कोटी लखपती दीदी करण्याचं उद्दिष्ट आहे,” असंही सांगितलं.


 Give Feedback



 जाहिराती