उरण : नागरिकांचे आरोग्य निरोगी राहावे, नागरिकांना होणाऱ्या विविध रोगाचे आजाराचे वेळेत निदान व्हावे, नागरिकांना त्यांच्या घराजवळच चांगले आरोग्य सेवा मिळावी, विविध आजार रोगाने त्रस्त असलेल्या नागरिकांवर योग्य उपचार व्हावेत,त्यांना दिलासा मिळावा या अनुषंगाने उरण तालुका शिवसेनेच्या वतीने उरण तालुक्यातील म्हातवली ठाकूर नगर येथील साई दर्शन सोसायटी येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
एमजीएम कामोठे हॉस्पिटलचे स्पेशालिस्ट डॉक्टरांच्या माध्यमातून रुग्णांची तपासणी करण्यात आली.डॉ. बागुल, स्नेहा शहाणे यांच्या टीमने विशेष सहकार्य केले.यावेळी औषधी तज्ञ, अस्थिरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ,नाक कान घसा तज्ञ,शल्य चिकित्स्क, चर्मरोग तज्ञ, हृदय विकार तज्ञ, दंतचिकीसक आदी विशेष डॉक्टरांची टीम उपस्थित होते. रुग्णांना मोफत गोळ्या औषधे देऊन त्यांचे मोफत तपासणी करण्यात आली. मोतीबिंदू डोळे तपासणी व ऑपरेशन यावेळी करण्यात आले. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे,शिवसेना उरण विधानसभा जिल्हा प्रमुख विनोद साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या आरोग्य शिबिराचे उद्घाटन उरण विधानसभा संपर्कप्रमुख रमेश म्हात्रे यांनी केले.
यावेळी महेंद्र पाटील (जिल्हा संघटक ),सुलेमान शेख( शहर प्रमुख), सुनील भोईर (संघटक शहर ),अक्षय म्हात्रे (विभाग प्रमुख ), समद भोंगले (जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक), महेश पाटील (उपविभाग प्रमुख), दशरथ चव्हाण (वाहतूक अध्यक्ष), संदेश म्हात्रे (शाखाप्रमुख म्हातवली )रफीक शेख (चार फाटा शाखाप्रमुख), विवेक चाळके, विरक्त चाळके,समीर केळकर, गणेश जळगावकर,तफजूल फसाटे, रोहित मस्के, मेहबूब शेख, कृष्णा पाटील अध्यक्ष साई दर्शन सोसायटी ठाकूर नगर आदि मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली आहे. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे,जिल्हाप्रमुख विनोद साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या या आरोग्य शिबिराला जनतेचा नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे. आरोग्य शिबिराचे योग्य व उत्तम असे नियोजन,आयोजन केल्याने नागरिकांनी या आरोग्य शिबिराचे कौतुक करत आयोजकांचे आभार मानले आहेत.आरोग्य शिबिराला चांगले सहकार्य केल्या बद्दल एमजीएम कामोठे हॉस्पिटलच्या सर्व टीमचे, साई दर्शन सोसायटी ठाकूर नगरच्या सर्व पदाधिकारी सदस्यांचे , ग्रामस्थ, नागरिकांचे यावेळी शिवसेनेच्या वतीने आभार मानण्यात आले.