पुणे : फोरम ऑफ ऑप्थल टीचर्स ऑफ इंडिया च्या दोन दिवसीय वार्षिक राष्ट्रीय अधिवेशनाचे उदघाटन दि. १० जानेवारी २०२६ रोजी स्वस्ति प्लाझा, भुवनेश्वर (ओडिशा) येथे झाले. या अधिवेशनाचे उद्घाटन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॅल्मॉलॉजी(पुणे)चे संस्थापक डॉ. श्रीकांत केळकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. अधिवेशनात देशभरातील नेत्रविज्ञान अध्यापक व प्रशिक्षक सहभागी झाले होते. यावेळी नेत्रविज्ञानातील अध्यापन व प्रशिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना फोरम तर्फे प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आले.नेत्रविज्ञान व प्रशिक्षण क्षेत्रातील आजीवन समर्पित अध्यापन कार्याचा गौरव म्हणून अनेकांचा सत्कार करण्यात आला .फोरम ऑफ ऑप्थल टीचर्स ऑफ इंडिया च्या वार्षिक राष्ट्रीय अधिवेशनाचे हे नववे वर्ष होते.