सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • नवी मुंबई विमानतळास दि.बा.पाटलांचं नाही, नरेंद्र मोदींचं नाव द्यायचंय, काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप
  • निवडणूक आयोगानं सांगितलं तर लाडक्या बहिणींचे पैसे 16 तारखेला देणार, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
  • पुण्यात महिला उमेदवाराकडून खास महिलांसाठीचा जाहीरनामा प्रकाशित
  • गाडीच्या टपावर चढून चंद्रकांत पाटील यांनी केले भाषण, पुण्यातील प्रचार फेरी दरम्यानचा व्हिडिओ व्हायरल
  • बारावीचे हॉल तिकीट उद्यापासून मिळणार;इयत्ता बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची हॉल तिकिटे ऑनलाईन पद्धतीने मिळणार ;संबंधित शाळा व ज्युनिअर कॉलेज यांनी हॉल तिकिटांचे प्रिंट आऊट काढून विद्यार्थ्यांना वितरित करावी, राज्य मंडळाची सूचना
  • मोठी बातमी: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न? बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ
 DIGITAL PUNE NEWS

जाधवर सायन्स फेस्टिव्हलमध्ये अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश

डिजिटल पुणे    12-01-2026 17:48:11

पुणे : प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, डॉ. सुधाकरराव जाधवर व्यवस्थापन व तंत्रज्ञान संस्था तसेच नर्सिंग संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सातव्या जाधवर सायन्स फेस्टिव्हल या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत विविध गटांमध्ये मानाचे क्रमांक पटकावले.

या राज्यस्तरीय विज्ञान स्पर्धेत यूजी–३ गटात वैष्णव लवंड व कृष्णा कुंभार यांच्या फेसपे (FacePay) या प्रकल्पास प्रथम क्रमांक मिळवला. यूजी–१ गटात विश्वजित चौधरी व आशुतोष केसरकर यांच्या त्रिनेत्र हेल्थ मॉनिटरिंग सिस्टिम (Trinetra Health Monitoring System) या प्रकल्पास द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच यूजी–३ गटात अदिती नाईक, गुरुप्रसाद दमगिरे व श्वेता बागडे यांच्या ग्रीन हॅबिट ट्रॅकिंग वेब सिस्टिम (Green Habit Tracking Web System) प्रकल्पाने  चतुर्थ क्रमांक मिळवत उत्कृष्ट सादरीकरण केले. या विद्यार्थ्यांना  प्रा. आशा माने, प्रा. नरसिंह पावडे, प्रा. स्नेहा गोडांबे व प्रा. स्नेहल शिंदे यांनी मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य व व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. यावेळी उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, प्रा. अनिल जगताप, प्रा. नाना झगडे, बीबीए–बीसीए विभाग प्रमुख प्रा. आशा माने, प्रा. अनुराधा कांबळे, प्रा. नरसिंह पावडे, प्रा. स्नेहल शिंदे, प्रा. नेहा गोडांबे, प्रा. अपूर्वा शिंदे, प्रा. प्रियंका लांडगे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आशा माने यांनी केले तर आभार प्रा. नरसिंह पावडे यांनी मानले.


 Give Feedback



 जाहिराती