सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • नवी मुंबई विमानतळास दि.बा.पाटलांचं नाही, नरेंद्र मोदींचं नाव द्यायचंय, काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप
  • निवडणूक आयोगानं सांगितलं तर लाडक्या बहिणींचे पैसे 16 तारखेला देणार, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
  • पुण्यात महिला उमेदवाराकडून खास महिलांसाठीचा जाहीरनामा प्रकाशित
  • गाडीच्या टपावर चढून चंद्रकांत पाटील यांनी केले भाषण, पुण्यातील प्रचार फेरी दरम्यानचा व्हिडिओ व्हायरल
  • बारावीचे हॉल तिकीट उद्यापासून मिळणार;इयत्ता बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची हॉल तिकिटे ऑनलाईन पद्धतीने मिळणार ;संबंधित शाळा व ज्युनिअर कॉलेज यांनी हॉल तिकिटांचे प्रिंट आऊट काढून विद्यार्थ्यांना वितरित करावी, राज्य मंडळाची सूचना
  • मोठी बातमी: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न? बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ
 शहर

बाबुरावजी घोलप महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन आणि मतदान शपथ उपक्रम

डिजिटल पुणे    13-01-2026 11:53:21

पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग (NSS) व विशेष दिन समिती यांच्या संयुक्त विद्यामाने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य व माहाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संगीता जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांच्या पवित्र स्मृती, पराक्रम व कार्यास अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. वंदना पिंपळे, विशेष दिन समिती समन्वयक प्रा. अपर्णा पांडे, महाविद्यालय परीक्षा अधिकारी डॉ. सुभाष वाव्हळ, रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी डॉ. नागेश भंडारी, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. भरत राठोड आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत असताना प्रा. अपर्णा पांडे यांनी राष्ट्रीय राजमाता जिजाऊ यांच्या शौर्य व कार्यावर प्रकाश टाकत स्वामी विवेकानंदांच्या जीवनावर थोडक्यात माहिती दिली. यावेळी कनिष्का गवांडे या विद्यार्थीनीने आपले मनोगत व्यक्त करत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्याविषयी उपस्थितांना सविस्तर माहिती दिली.

आपल्या मनोगतात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य व माहाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संगीता जगताप यांनी राजमाता जिजाऊ यांनी दिलेल्या संस्कार व पराक्रमाच्या बाळकडू मुळे छत्रपती शिवाजी महाराज यांना हिंदवी स्वराज्य घडवण्याची प्रेरणा मिळाल्याचे नमूद करत अध्यात्म, योग, शिक्षण या विषयावर आपल्या वैचारिक प्रगल्भतेने संपुर्ण जगाला प्रभावीत करत स्वामी विवेकानंद यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे नेतृत्व केल्याचे सांगितले. विशेषतः देशाचे भवितव्य घडवणाऱ्या युवा पिढीसाठी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद हे आदर्श असुन आज समाज अनेक अडचणींना सामोरे जात असताना युवकांनी समाजाप्रती आपली भूमिका समजून घेत समाज उभारणीमध्ये योगदान देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.

येत्या १५ जानेवारी रोजी होणाऱ्या महापालिका निवडणुक मतदार जनजागृती अभियान अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नितीन वाघ, श्रावण डाखोळे, अनिश रांगणेकर यांनी उपस्थित राहत निर्भय व निष्पक्ष मतदान करण्याची शपथ उपस्थितांना दिली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भरत राठोड तर आभार प्रदर्शन डॉ. अमृता इनामदार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले असून प्रणित पावले यांनी विशेष तांत्रिक सहाय्य केले.


 Give Feedback



 जाहिराती