सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • नवी मुंबई विमानतळास दि.बा.पाटलांचं नाही, नरेंद्र मोदींचं नाव द्यायचंय, काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप
  • निवडणूक आयोगानं सांगितलं तर लाडक्या बहिणींचे पैसे 16 तारखेला देणार, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
  • पुण्यात महिला उमेदवाराकडून खास महिलांसाठीचा जाहीरनामा प्रकाशित
  • गाडीच्या टपावर चढून चंद्रकांत पाटील यांनी केले भाषण, पुण्यातील प्रचार फेरी दरम्यानचा व्हिडिओ व्हायरल
  • बारावीचे हॉल तिकीट उद्यापासून मिळणार;इयत्ता बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची हॉल तिकिटे ऑनलाईन पद्धतीने मिळणार ;संबंधित शाळा व ज्युनिअर कॉलेज यांनी हॉल तिकिटांचे प्रिंट आऊट काढून विद्यार्थ्यांना वितरित करावी, राज्य मंडळाची सूचना
  • मोठी बातमी: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न? बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ
 जिल्हा

गर्दीने भरलेल्या लोकलमध्ये लटकून प्रवास; हात सटकला अन् क्षणात अनर्थ, प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू

डिजिटल पुणे    13-01-2026 13:02:59

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल रेल्वे पुन्हा एकदा प्रवाशाच्या मृत्यूमुळे चर्चेत आली आहे. लोकलमधील प्रचंड गर्दी आणि प्रशासनाच्या अपयशी नियोजनामुळे आणखी एका प्रवाशाला आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. धावत्या लोकलमधून खाली पडून मनीष बाळू लोखंडे (वय अंदाजे ३५) या प्रवाशाचा मृत्यू झाला असून या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

ही घटना रविवारी दुपारी नाहूर रेल्वे स्थानक परिसरात घडली. मध्य रेल्वेवर दर रविवारी सिग्नल व रुळांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी जाहीर करण्यात येणाऱ्या मेगाब्लॉकमुळे लोकल वाहतूक विस्कळीत होते. परिणामी, स्थानकांवर प्रचंड गर्दी उसळते आणि प्रवाशांना दरवाजात लटकून प्रवास करण्याची वेळ येते. मनीष लोखंडे यांचा मृत्यू हा अशाच रविवार मेगाब्लॉकचा बळी असल्याचे रेल्वे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

नेमकं काय घडलं?

मनीष बाळू लोखंडे हे माटुंगा येथील रेल्वे वर्कशॉपमध्ये टेक्निशियन म्हणून कार्यरत होते. रविवारी त्यांनी कुर्ला येथून बदलापूरसाठी लोकल पकडली होती. मात्र, लोकलमध्ये प्रचंड गर्दी असल्याने त्यांना दरवाजात लटकून प्रवास करावा लागला. लोकल दुपारी सुमारे १.५० वाजता नाहूर स्थानकाजवळ पोहोचत असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि ते थेट रुळांवर कोसळले.

या अपघातात मनीष यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिस व रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या प्रकरणी कुर्ला रेल्वे पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, लोकलमधील वाढती गर्दी, अपुरी वाहतूक व्यवस्था आणि रविवार मेगाब्लॉकमुळे प्रवाशांच्या जीवाला निर्माण होणारा धोका पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


 Give Feedback



 जाहिराती