पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात काही धनाढ्य उमेदवारांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची उधळण केल्याचे प्रकार समोर येत आहेत. काही उमेदवारांकडून चारचाकी गाडी, थायलंड टूर, एक गुंठा जमीन अशा आकर्षक ऑफर्स दिल्या जात असल्याची चर्चा आहे.वाढत्या स्पर्धेमुळे आणि राजकीय ताकद दाखवण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात खर्च केला जात असल्याचे चित्र आहे.
कसबा विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 25 मध्ये पैठणीच्या खेळात विजयी झालेल्या महिलांना हेलिकॉप्टर राईडचे बक्षीस देण्यात आल्याचा प्रकार चर्चेत आला होता. तसेच पुण्याच्या प्रभाग क्रमांक 1 (लोहगाव–धानोरी) येथे एका इच्छुक उमेदवाराने 11 गुंठे जमिनीचे प्लॉट (प्रत्येकी 1100 चौ.फुट) लकी ड्रॉद्वारे देण्याचे आश्वासन दिल्याचे समोर आले आहे.निवडणूक आयोग आणि महापालिका प्रशासनाकडून अशा प्रकारांवर कडक नजर ठेवली जात असून, आचारसंहिता भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.