सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • नवी मुंबई विमानतळास दि.बा.पाटलांचं नाही, नरेंद्र मोदींचं नाव द्यायचंय, काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप
  • निवडणूक आयोगानं सांगितलं तर लाडक्या बहिणींचे पैसे 16 तारखेला देणार, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
  • पुण्यात महिला उमेदवाराकडून खास महिलांसाठीचा जाहीरनामा प्रकाशित
  • गाडीच्या टपावर चढून चंद्रकांत पाटील यांनी केले भाषण, पुण्यातील प्रचार फेरी दरम्यानचा व्हिडिओ व्हायरल
  • बारावीचे हॉल तिकीट उद्यापासून मिळणार;इयत्ता बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची हॉल तिकिटे ऑनलाईन पद्धतीने मिळणार ;संबंधित शाळा व ज्युनिअर कॉलेज यांनी हॉल तिकिटांचे प्रिंट आऊट काढून विद्यार्थ्यांना वितरित करावी, राज्य मंडळाची सूचना
  • मोठी बातमी: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न? बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ
 शहर

कंबर व मणक्यांच्या दुखण्याच्या उपचारात ए एन एस एस आय वेलनेस (ANSSI Wellness) ठरत आहे नवी आशा- संस्थापक दिनेश दळवी

डिजिटल पुणे    14-01-2026 15:52:25

पुणे :आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे मानदुखी, कंबरदुखी, सायटिका, स्लिप डिस्क, स्पॉन्डिलायसिस, स्पॉन्डिलोसिस यांसारख्या मणक्यांच्या (स्पाईन) आजारांनी त्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बहुतांश वेळा या आजारांवर औषधोपचार किंवा शस्त्रक्रियाच अंतिम उपाय मानला जातो. मात्र ए एन एस एस आय वेलनेस (ANSSI Wellness) येथे कोणतीही औषधे, इंजेक्शन, भूल (अ‍ॅनेस्थेशिया) किंवा शस्त्रक्रिया न करता मणक्यांच्या आजारांवर उपचार केले जात असल्याची माहिती  औंध येथे ए एन एस एस आय वेलनेस(ANSSI Wellness) सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी  संस्थापक दिनेश दळवी यांनी दिली. यावेळी सुमेध स्थूल, उपचार तज्ज्ञ डॉ. विद्या झिलपे, माजी आयएएस अधिकारी केशव कांबळेे, संतोष संखद, व्यवसायिक भोसले, शिर्के कंपनी के व्यवस्थापक  आर बी सूर्यवंशी अँड. ढोकणे, डॉ. अमूप गजविये, व्यवस्थापक मंगेश कदम, इंजि. इक्बाल पीरझादे, डॉ. रमेश चौधरी, डॉ. अनुराधा कदम, डॉ. सपना,  डाॅ. आकांक्षा, यश मोरे, सोहन कांबले,  डॉ. अनुराग, जमुना आणि आकांक्षा मल्लाडे  यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

संस्थापक दिनेश दळवी पुढे म्हणाले की,  काही वर्षांपूर्वी मणक्यांच्या आजाराने मी स्वत: त्रस्त होतो,  भारतात विविध उपचार करूनही आराम न मिळाल्याने अमेरिकेत सुप्रसिद्ध स्पाईन तज्ज्ञ डॉ. जोसेफ कॅमराटा यांच्याकडून स्पायनल डी-कंप्रेशन उपचार घेतले. या उपचारामुळे पूर्णपणे बरे झाल्यानंतर ही शस्त्रक्रियाविरहित उपचार पद्धत भारतात उपलब्ध करून देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. याच पार्श्‍वभूमीवर  ए एन एस एस आय वेलनेस (ANSSI Wellness) सेंटर औंध येथे सुरु करण्यात आले आहे. सध्या ए एन एस एस आय वेलनेस (ANSSI Wellness)सेंटर मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, हैदराबाद, बंगळुरू, पटना तसेच दुबईसह अनेक शहरांमध्ये कार्यरत आहेत.

माजी आयएएस अधिकारी केशव कांबळेे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, भारतातील नागरिकांसाठी ही ट्रीटमेंट खुपच आवश्यक आहे कारण शस्त्रक्रियेसाठी येणारा खर्च पाहता येथे तोच खर्च निम्यावर येतो आणि त्रास ही कमी होतो.हे उपचार नॉन-सर्जिकल स्पायनल डी-कंप्रेशन (Spinal Decompression) या आधुनिक व अमेरिकन पेटंट असलेल्या तंत्रज्ञानावर आधारित आहेत. डिस्क बाहेर येऊन मज्जासंस्थेवर (नर्व्ह) पडणारा ताण कमी करून नैसर्गिक पद्धतीने उपचार केले जातात. मानदुखी, कंबरदुखी, सायटिका, स्लिप डिस्क तसेच मणक्यांशी संबंधित विविध आजारांवर ही पद्धत प्रभावी ठरत असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले. ही उपचार पद्धत हार्वर्ड, मेयो क्लिनिक व जॉन्स हॉपकिन्स यांसारख्या नामांकित संस्थांशी संबंधित शास्त्रज्ञांनी विकसित केली असून, विकसित देशांमध्ये गेल्या 40 वर्षांपासून आणि भारतात गेल्या 10 वर्षांपासून या पद्धतीचा यशस्वी वापर सुरू आहे. भारतात आतापर्यंत 8,000 हून अधिक रुग्णांच्या शस्त्रक्रिया टाळण्यात ए एन एस एस आय वेलनेस (ANSSI Wellness) सेंटर ला यश आले असून, पुण्यात गेल्या चार वर्षांत 2,500 पेक्षा अधिक रुग्णांना या उपचाराचा लाभ मिळाला आहे

यावेळी डॉ. विद्या झिलपे यांच्या "Spine Care' या पुस्तकाला मिळालेल्या आंतरराष्ट्रीय पुरस्काराची माहितीही देण्यात आली. तसेच या पुस्तकाचे वितरण आलेल्या सर्वांना करण्यात आले. 3,000 चौरस फूट क्षेत्रफळात असलेल्या  ए एन एस एस आय वेलनेस (ANSSI Wellness) सेंटर मध्ये 50 पेक्षा जास्त अनुभवी स्पाइन तज्ज्ञ येथे कार्यरत आहेत. 90 टक्क्यांपेक्षा अधिक यश दरासह आजीवन आराम देण्याचा दावा करणारे हे केंद्र मणक्यांच्या आजारांच्या उपचारात आशेचा किरण बनले आहे.


 Give Feedback



 जाहिराती