सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मतदानानंतर बोटावरील शाई पुसून बोगस मतदानाचा आरोप ;रूपाली चाकणकरांची निवडणूक आयोगाकडे तक्रार; पुणे, मुंबईसह राज्यभरात खळबळ
  • मतदान करुन बाहेर पडताच राज ठाकरे संतापले, उद्वेगाने म्हणाले, 'सगळी सिस्टीम सत्ताधाऱ्यांसाठी काम करतेय'
  • : पुण्यात मतदान केंद्रावर गोंधळ! गुरुवार पेठेत मशीन बंद, उमेदवार आक्रमक, लोकशाहीच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह?
  • “भाजपकडून पैसे वाटपाचे व्हिडीओ माझ्याकडे...” – प्रशांत जगताप यांचा गंभीर आरोप
  • : पिंपरी चिंचवड प्रभाग क्रमांक 13 मधील मतदान प्रक्रिया तब्बल पाऊण तास बंद
  • महाराष्ट्रात हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा एकच ब्रँड; मुंबईमध्ये शिवसेना - भाजपची सत्ता येईल : दादा भुसे
  • गायब नाव, पैसे, दबाव... पिंपरी-चिंचवड मतदान केंद्रात गोंधळ, रोहितदादा पवारांचे संतप्त वक्तव्य
 विश्लेषण

शाई पुसून गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणे शक्य नाही

डिजिटल पुणे    15-01-2026 17:24:45

मुंबई : बोटावर लावण्यात आलेली शाई पुसण्याचा प्रयत्न करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हे गैरकृत्य आहे. त्याचबरोबर बोटावरची शाई पुसून एखादी व्यक्ती पुन्हा मतदान करण्यासाठी आल्याचे आढळल्यास त्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगाने केले आहे.

बोटावरची शाई पुसून कोणी गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला तरी संबंधित मतदाराला पुन्हा मतदान करता येत नाही, याबाबतची दक्षता यापूर्वीच घेण्यात आली आहे. मतदाराने मतदान केल्यानंतर त्याबाबत नोंद घेण्यात आलेली असते. त्यामुळे केवळ शाई पुसून गैरकृत्य केलेल्या मतदाराला पुन्हा मतदान करता येत नाही. याबाबत सतर्कता बाळगण्याच्या सूचना पुन्हा एकदा सर्व संबंधिताना देण्यात आल्या आहेत.

मतदाराच्या बोटाला शाई लावण्याकरिता मार्कर पेनच्या वापराबाबत राज्य निवडणूक आयोगाने 19 नोव्हेंबर 2011 रोजी आणि 28 नोव्हेंबर 2011 रोजी आदेश निर्गमित केले आहेत. तेव्हापासून स्थानिक स्वराज्‍य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदाराच्या बोटाला शाई लावण्यासाठी मार्कर पेनचा वापर केला जात आहे. या आदेशानुसार मतदाराच्या बोटावर ठळकपणे उमटेल, अशा पद्धतीने मार्कर पेनने शाई लावण्यात यावी; तसेच नखावर आणि नखाच्या वरच्या बाजुला त्वचेवर तीन- चार वेळा घासून शाई लावावी, अशा सूचना यापूर्वीदेखील देण्यात आल्या असून आणि त्या मार्कर पेनवरही नमूद केल्या आहेत. त्यामुळे शाई पुसण्याचा प्रयत्न करण्याचे गैरकृत्य करू नये, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केले आहे.बोटावरील शाई पुसली जात असल्याचे महानगरपालिका आयुक्त यांनी मान्य केल्याच्या वृत्तात तथ्य नाही

बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-2026 साठी मतदान केल्यानंतर बोटावरील शाई पुसली जात असल्याचे वृत्त विविध माध्यमांतून प्रसारित होत आहे. महानगरपालिका आयुक्त यांनी ही बाब मान्य केल्याचेही या वृत्तात सांगितले जात आहे.

याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे की, मतदानानंतर बोटावरील शाई पुसली जात असल्याबाबत महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी कोणत्याही प्रकारचे विधान अथवा वक्तव्य केलेले नाही. त्यामुळे, माध्यमांत प्रसारित होणाऱ्या वृत्तात कोणतेही तथ्य नाही.

 

 


 Give Feedback



 जाहिराती