सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी: पुण्यात आंदेकर गँगच्या उमेदवाराचा विजय, रवींद्र धंगेकरांच्या पत्नीलाच पाडलं
  • प्रभाग क्रमांक 10 मधुन भाजपाचे चार ही उमेदवार विजयी
  • प्रभाग क्रमांक १८ ड मधून अटीतटीच्या लढतीत काँग्रेसचे प्रशांत जगताप विजयी
  • कोल्हापूर प्रभाग क्रमांक 9 मध्ये महायुती सर्व जागांवर विजयी
  • दक्षिण मुंबईत भाजपनं खातं उघडलं! वॉर्ड २१४, २१५ मधून भाजपचा विजय
  • पुणे निवडणूक आयोगाची अधिकृत आकडेवारी ;भाजप 47 ठिकाणी तर राष्ट्रवादी 6 काँग्रेस 3 ठिकाणी आघाडीवर
  • पुणे निवडणूक आयोगाची अधिकृत आकडेवारी; भाजप 27 ठिकाणी तर राष्ट्रवादी 4 ठिकाणी आघाडीवर
  • प्रभाग क्रमांक २५ मध्ये दुसऱ्या फेरीत ही भाजपा उमेदवारांची आघाडी कायम
 विश्लेषण

‘हिंद-दी-चादर’ जागतिक पातळीवरील ऐतिहासिक सोहळा ठरावा – विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

डिजिटल पुणे    19-01-2026 12:19:14

नांदेड :  नांदेड येथे २४ व २५ जानेवारी रोजी आयोजित करण्यात येणारा “हिंद-दी-चादर” हा कार्यक्रम केवळ मराठवाडा किंवा महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून, जागतिक पातळीवर भारताची श्रद्धा, बलिदान आणि मानवी मूल्यांची महान परंपरा अधोरेखित करणारा ऐतिहासिक सोहळा ठरणार आहे. श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आयोजित या भव्य कार्यक्रमाकडे देश-विदेशातील भाविक, संत-महात्मे व मान्यवरांचे लक्ष वेधले जाणार असून, त्यामुळे हा कार्यक्रम जागतिक स्तरावर पोहोचवावा, असे आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केले.

कार्यक्रमाच्या प्रसिद्धी व माध्यम नियोजनाच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, लातूरचे उपसंचालक (माहिती) विवेक खडसे, जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे, लातूर जिल्हा माहिती अधिकारी तानाजी घोलप, हिंगोली जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते, सहायक संचालक श्याम टरके यांच्यासह माध्यम प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभागीय आयुक्त श्री. पापळकर पुढे म्हणाले की, हा कार्यक्रम प्रत्येक गावागावात, प्रत्येक घरापर्यंत आणि प्रत्येक मुलापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व माध्यमांनी समन्वयाने व सकारात्मक दृष्टीकोनातून सहकार्य करावे. माध्यमांची भूमिका या ऐतिहासिक कार्यक्रमात अत्यंत महत्त्वाची असून, समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य माध्यमांद्वारे घडू शकते, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी “हिंद-दी-चादर” अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या सविस्तर नियोजनाची माहिती दिली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माध्यमांनी सेवेच्या भावनेतून सकारात्मक योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.बैठकीदरम्यान माध्यम प्रतिनिधींनी आपली मते मांडली तसेच कार्यक्रमाच्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणी व सूचनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.


 Give Feedback



 जाहिराती