पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत 'उत्तरायण मार्गम्' हे भरतनृत्यम सादरीकरण आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात डॉ. पद्मा सुब्रह्मण्यम आणि डॉ. जयश्री राजगोपालन यांच्या शिष्या असलेल्या ऐश्वर्या हरीश यांचे वाद्यवृंदासह भरतनाट्यम सादरीकरण होणार आहे.हा कार्यक्रम शनिवार,दि.२४ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता भारतीय विद्या भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृह(सेनापती बापट रस्ता) येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य आहे.
कार्यक्रमात गायनासाठी नट्टूवांगमसाठी डॉ.जयश्री राजगोपालन,हरीश वेंकटेश्वरन,मृदंगमवर श्रीराम सुब्बारामन आणि व्हायोलिनवर सतीश शेषाद्री साथसंगत करणार आहेत.भारतीय विद्या भवनच्या सांस्कृतिक उपक्रमांमधील हा २७६ वा कार्यक्रम असल्याची माहिती भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी दिली.या सादरीकरणात शास्त्रीय नृत्याची सौंदर्यपूर्ण अभिव्यक्ती, भाव, ताल आणि लय यांचा समन्वय अनुभवायला मिळणार आहे.