सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी: पुण्यात आंदेकर गँगच्या उमेदवाराचा विजय, रवींद्र धंगेकरांच्या पत्नीलाच पाडलं
  • प्रभाग क्रमांक 10 मधुन भाजपाचे चार ही उमेदवार विजयी
  • प्रभाग क्रमांक १८ ड मधून अटीतटीच्या लढतीत काँग्रेसचे प्रशांत जगताप विजयी
  • कोल्हापूर प्रभाग क्रमांक 9 मध्ये महायुती सर्व जागांवर विजयी
  • दक्षिण मुंबईत भाजपनं खातं उघडलं! वॉर्ड २१४, २१५ मधून भाजपचा विजय
  • पुणे निवडणूक आयोगाची अधिकृत आकडेवारी ;भाजप 47 ठिकाणी तर राष्ट्रवादी 6 काँग्रेस 3 ठिकाणी आघाडीवर
  • पुणे निवडणूक आयोगाची अधिकृत आकडेवारी; भाजप 27 ठिकाणी तर राष्ट्रवादी 4 ठिकाणी आघाडीवर
  • प्रभाग क्रमांक २५ मध्ये दुसऱ्या फेरीत ही भाजपा उमेदवारांची आघाडी कायम
 शहर

भारती विद्यापीठ आयएमईडी च्या एमबीए एमसीए अभ्यासक्रमाची घोषणा

डिजिटल पुणे    19-01-2026 17:14:07

पुणे :  भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय च्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड एन्त्रप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट(आयएमईडी) पुणे  तर्फे एमबीए ,एमबीए एचआर तसेच एमसीए  अभ्यासक्रमांची आणि प्रवेश प्रक्रियेची घोषणा करण्यात आली आहे.  बी मॅट -२०२६ प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून एमबीए आणि एमबीए एचआर,एमसीए  अभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिला जाणार आहे.महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया २०२६ साठी अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होत आहे. प्रवेश  प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी   मोबाईल क्रमांक ९६९९२९३५०४ ,९९२३०३०२१२ आणि  [email protected] या ईमेल वर संपर्क साधावा.तसेच याविषयी अधिक माहिती imed.bharatividyapeeth.edu या वेबसाइट वर माहिती उपलब्ध करून दिली आहे.

संस्थेच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार इच्छुक व पात्र उमेदवारांनी  ८ फेब्रुवारी २०२६ या अंतिम तारखेपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे. प्रवेश २०२६ साठी इच्छुक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाशी संपर्क साधून व वेबसाइट पाहून अधिक माहिती घ्यावी व या नाविन्यपूर्ण, अनुभवाधारित शिक्षणप्रणालीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.बदलत्या उद्योगविश्वाच्या गरजा ओळखून अभ्यासक्रम रचना, अध्यापन पद्धती आणि प्रत्यक्ष अनुभवावर आधारित शिक्षण ही या महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.भारती विद्यापीठाला नॅककडून ए प्लस प्लस श्रेणी प्राप्त झाली असून एनआयआरएफ रँकिंग २०२५ मध्ये विद्यापीठाने ५९ वे मानांकन  मिळवले  आहे. तसेच आयएमईडी ही भारतातील अव्वल  ३% बिझनेस स्कूल्स यादी मध्ये समाविष्ट असल्याची माहिती देण्यात आली आहे.


महाविद्यालयाची खास ओळख ठरणारी “भारती बिझनेस क्लिनिक (Bharati Business Clinic)” ही संकल्पना विद्यार्थ्यांना केवळ केस स्टडीजपुरते मर्यादित न ठेवता खऱ्या उद्योग व व्यावसायिक समस्यांवर प्रत्यक्ष काम करण्याची संधी देते. स्थानिक उद्योजक, स्टार्टअप्स आणि संस्थांसोबत काम करताना विद्यार्थी समस्या विश्लेषण, उपाययोजना व अंमलबजावणीचा प्रत्यक्ष अनुभव घेतात.यासोबतच एक्स्टर्नशिप्स (Externships), इंडस्ट्री प्रोजेक्ट्स आणि इंटर्नशिप्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमादरम्यानच उद्योगाचा प्रत्यक्ष परिचय मिळतो. ॲक्टिव्ह आणि प्रोजेक्ट-बेस्ड लर्निंग, फ्लिप्ड क्लासरूम्स यांसारख्या आधुनिक अध्यापन पद्धतींमुळे वर्गातील शिक्षण अधिक संवादात्मक, परिणामकारक व कौशल्याभिमुख बनते.


महाविद्यालयातील सुसज्ज व तंत्रज्ञानसंपन्न वर्गखोल्या, डिजिटल साधनसुविधा आणि अभ्यासासाठी अनुकूल वातावरण हे विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेला बळकटी देतात. तसेच विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व व्यवस्थापनविषयक उपक्रमांचे आयोजन सुरू करण्याची व नेतृत्व करण्याची संधी विद्यार्थ्यांना दिली जाते, ज्यामुळे नेतृत्वगुण, संघकार्य व निर्णयक्षमता विकसित होते.उद्योगातील अनुभव असलेले प्राध्यापक आणि शैक्षणिक काटेकोरपणा (Academic Rigour) यांचा समतोल साधत हे महाविद्यालय विद्यार्थ्यांना करिअर-सज्ज बनवते. ज्ञान, कौशल्य आणि मूल्याधारित शिक्षण यांचा संगम साधणारे हे शिक्षण मॉडेल विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी दिशादर्शक ठरत आहे,असे आयएमईडी च्या पत्रकात म्हटले आहे. 


 Give Feedback



 जाहिराती