सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अपघात रोखण्यासाठी ‘पीटीझेड ‘ कॅमेरे,नवले पुलाजवळ बसविले,वेगावर नियंत्रण राहणार
  • मोठी बातमी: पुण्यात आंदेकर गँगच्या उमेदवाराचा विजय, रवींद्र धंगेकरांच्या पत्नीलाच पाडलं
 शहर

पुणेकर पाणी जपून वापरा; २ दिवस पाणीपुरवठा विस्कळीत कधी, कुठे आणि किती काळ पाणी बंद राहणार? वाचा सविस्तर

डिजिटल पुणे    20-01-2026 10:10:56

पुणे :  पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शहरातील पाणीपुरवठा दोन दिवस विस्कळीत राहणार असून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रावेत उपसा केंद्र येथून पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीचे स्थलांतराचे काम हाती घेण्यात आले आहे.

हे काम बुधवार, 21 जानेवारी रोजी करण्यात येणार असून, त्या दिवशी संबंधित जलवाहिनीवरील पाणीपुरवठा पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे बुधवारी संपूर्ण दिवस पाणी येणार नाही. तसेच गुरुवार, 22 जानेवारी रोजी पाणीपुरवठा उशिरा आणि कमी दाबाने होणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

रावेत उपसा केंद्राचे महत्त्व

रावेत उपसा केंद्र ही पुणे शहराच्या पाणीपुरवठ्याची अत्यंत महत्त्वाची यंत्रणा आहे. येथून मोठ्या प्रमाणावर शहराला पाणीपुरवठा केला जातो. जलवाहिनी बाजूला हटविण्याचे काम हे नियोजित विकासकामाचा भाग असून भविष्यातील तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी आणि सुरक्षित पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी हे काम आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

कोणत्या भागांना फटका?

या कामाचा परिणाम खालील भागांतील पाणीपुरवठ्यावर होणार आहे—

कळस ,माळवाडी, जाधव वस्ती ,गणेशनगर (बोपखेल), विश्रांतवाडीचा काही भाग ,म्हस्के वस्ती ,संजय पार्क, बर्माशेल परिसर, विमानतळ व आसपासचा परिसर या भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी पाण्याचा साठा करून ठेवावा, तसेच उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

महापालिकेचे आवाहन

महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी कर्मचारी युद्धपातळीवर काम करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. कोणतीही अडचण असल्यास नागरिकांनी संबंधित पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधावा, असेही कळवण्यात आले आहे.


 Give Feedback



 जाहिराती