सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अंतराळात विक्रम रचणाऱ्या सुनिता विल्यम्स यांची नासातून एक्झिट ;तीन मोहिमा, 9 स्पेसवॉक, 608 दिवस; सुनिता विल्यम्स यांची ऐतिहासिक निवृत्ती
  • तीन मोहिमेतून तब्बल 608 दिवस अंतराळात घालवलेल्या सुनिता विल्यम्स यांची 'नासा'तून निवृत्ती; अंतराळ रणरागिनीची सोन्याची पावलं आता जमिनीवर 'विसावणार'
  • शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीला तारीख पे तारीख सुरुच! आता थेट बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी 23 जानेवारीला सुनावणी होणार!
  • ठाकरेंच्या शिवसेनेकडून गटनेतेपदी किशोरी पेडणेकरांची निवड; उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय
 DIGITAL PUNE NEWS

‘डोमिनार ४०० : सायकलपटूंकरिता अत्याधुनिक सुरक्षा कवच ;बजाज पुणे ग्रँड टूर २०२६

डिजिटल पुणे    21-01-2026 17:38:54

पुणे : ‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’ करिता बजाज कंपनीकडून पुणे, पिंपरी चिंचवड पोलीस शहर आयुक्तालयाकरिता प्रत्येकी २५ आणि पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलाकरिता ५० अशा ‘डोमिनार ४००’या अत्याधुनिक सुविधांनीयुक्त १०० मोटार सायकलीचे देण्यात आल्या असून सायकलपट्टूंना सुरक्षा कवच म्हणून काम करीत आहेत.स्पर्धेच्या ४३७ कि.मी. अंतराच्या सायकल स्पर्धेच्या मार्गावर ही मोटरसायकल प्रथम अधिकृतपणे ताफ्याचा भाग आहे. या मोटरसायकली स्पर्धेच्या मार्गावर प्रभावीपणे गस्त घालण्यासोबतच शीघ्रगतीने आपत्कालीन प्रतिसादाचे काम आहे. विशेषत: स्पर्धेत नागरिकांचे लक्ष आकर्षित करीत आहे.

डोमिनार ४०० या आधुनिक मोटरसायकल पोलिसांना आव्हानात्मक कामे करतांना लागणाऱ्या गरजांचा विचार करून त्यांच्या मूळ आवृत्त्यांपेक्षा मोठ्या प्रमाणात सुधारित करण्यात आल्या आहेत. सुधारित दृश्यमानता आणि दळणवळण: वाहतूक व्यवस्थापित करण्यासाठी आणि घटनांना प्रभावीपणे प्रतिसाद देण्यासाठी ‘डोमिनार ४००’ मध्ये शक्तिशाली एलईडी आपत्कालीन दिवे, सायरन आणि पुश-टू-टॉक रेडिओ ट्रान्समिशनसह सार्वजनिक घोषणा प्रणाली बसविण्यात आली आहे. यामध्ये जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम आणि मोबाईल फोन व वॉकी-टॉकीसारख्या आवश्यक उपकरणांसाठी चार्जिंग पॉइंट्स यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.

प्रत्येक ‘डोमिनार ४००’ मध्ये आपत्कालीन प्रथमोपचार किट बसविण्यात आले आहे. या बाइक्समध्ये एकात्मिक आणि कुलूप लावता येण्याजोग्या साइड पॅनियर्ससह टॉप बॉक्स येतो, जो प्रथमोपचार किट, फॉरेन्सिक साधने आणि कागदपत्रे यांसारखी आवश्यक उपकरणे वाहून नेण्यासाठी तयार करण्यात आला आहे. सुधारित कार्यक्षमता, हाताळणी आणि सुरक्षा: शक्तिशाली ३७३.३ सीसी लिक्विड-कूल्ड इंजिन आणि विश्वसनीय कार्यक्षमतेसह सुसज्ज असलेल्या ‘डोमिनार ४००’ मध्ये हाय-स्पीड पाठलाग किंवा आव्हानात्मक परिस्थितीत उत्तम हाताळणी, कुशलता आणि सुरक्षिततेसाठी अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम , ट्रॅक्शन कंट्रोल आणि इलेक्ट्रॉनिक सस्पेंशन ॲडजस्टमेंट यासारखी प्रगत रायडर सहाय्यक वैशिष्ट्ये आहेत.


 Give Feedback



 जाहिराती