सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अंतराळात विक्रम रचणाऱ्या सुनिता विल्यम्स यांची नासातून एक्झिट ;तीन मोहिमा, 9 स्पेसवॉक, 608 दिवस; सुनिता विल्यम्स यांची ऐतिहासिक निवृत्ती
  • तीन मोहिमेतून तब्बल 608 दिवस अंतराळात घालवलेल्या सुनिता विल्यम्स यांची 'नासा'तून निवृत्ती; अंतराळ रणरागिनीची सोन्याची पावलं आता जमिनीवर 'विसावणार'
  • शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीला तारीख पे तारीख सुरुच! आता थेट बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी 23 जानेवारीला सुनावणी होणार!
  • ठाकरेंच्या शिवसेनेकडून गटनेतेपदी किशोरी पेडणेकरांची निवड; उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय
 जिल्हा

मुंबई व पुणे विद्यापीठांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्याबाबत बैठक

डिजिटल पुणे    22-01-2026 10:32:04

मुंबई : राज्यातील अनेक आदिवासी विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी दुर्गम भागातून मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये येतात. या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक परिसरात राहण्याची सोय व्हावी यासाठी मुंबई व पुणे विद्यापीठाच्या परिसरात वसतिगृह उभारण्यासंदर्भात आढावा बैठक आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या अध्यक्षतेखाली झाली.बैठकीस मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, ठाणे अप्पर आयुक्त गोपीचंद कदम, सहसचिव मच्छिंद्र शेळके, मुख्य अभियंता उज्वल डाबे उपस्थित होते.

आदिवासी विकास मंत्री डॉ. वुईके म्हणाले, आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लागणाऱ्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभाग नेहमीच प्रयत्नशील असतो. अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपला जिल्हा सोडून इतर जिल्ह्यात जात असतात. या वसतीगृहांचा लाभ केवळ विद्यापीठातीलच नव्हे तर विद्यापीठाशी संलग्न विविध महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांनाही मिळणार आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांना सुरक्षित व परवडणाऱ्या निवासाची सोय उपलब्ध होणार आहे. आगामी काळात राज्यातील इतर प्रमुख विद्यापीठांच्या परिसरातही अशाच प्रकारच्या वसतीगृह सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आदिवासी समाजाचा इतिहास आणि संस्कृती पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रमुख विद्यापीठामध्ये आदिवासी अध्ययन व संशोधन केंद्र सुरू करण्यासंदर्भातील प्रस्ताव असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.


 Give Feedback



 जाहिराती