सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अंतराळात विक्रम रचणाऱ्या सुनिता विल्यम्स यांची नासातून एक्झिट ;तीन मोहिमा, 9 स्पेसवॉक, 608 दिवस; सुनिता विल्यम्स यांची ऐतिहासिक निवृत्ती
  • तीन मोहिमेतून तब्बल 608 दिवस अंतराळात घालवलेल्या सुनिता विल्यम्स यांची 'नासा'तून निवृत्ती; अंतराळ रणरागिनीची सोन्याची पावलं आता जमिनीवर 'विसावणार'
  • शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीला तारीख पे तारीख सुरुच! आता थेट बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी 23 जानेवारीला सुनावणी होणार!
  • ठाकरेंच्या शिवसेनेकडून गटनेतेपदी किशोरी पेडणेकरांची निवड; उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय
 जिल्हा

प्रलंबित प्रकरणांच्या निपटाऱ्यातून मिळतोय जलद न्याय..! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार

डिजिटल पुणे    23-01-2026 11:07:52

मुंबई : ‘सर्वांसाठी न्याय.. जलद न्याय’ या तत्वावर राज्य शासन काम करीत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली जलद गतीने न्याय मिळण्यासाठी न्यायदान साखळीतील कमतरता दूर करण्यात येत आहे. नवीन फौजदारी कायद्याअंतर्गत जलद न्यायाला प्राधान्य दिले असून  त्यानुसार न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेतील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात येत आहे.  त्यामुळे न्यायदानाची प्रक्रिया जलद झाली आहे.

न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय अंतर्गत असलेली प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  विशेष मोहीम राबविण्याबाबत सूचित केले. तसेच त्यांनी नियमित आढावा घेत या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याची प्रक्रिया गतिमान केली. संचालनालयाकडील प्रयोगशाळांमध्ये 2025 मध्ये  एक लाख 81 हजार प्रकरणे प्रलंबित होती. तसेच दोन लाख 94 हजार इतकी प्रकरणे आवक झाली. संचालनालयाने विशेष मोहिम राबवून डिसेंबर 2025 अखेर तीन लाख 96 हजार 879 इतक्या प्रकरणांचा निपटारा करून 79 हजार 542  इतकी प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी केली आहे.

या विशेष मोहिमेअंतर्गत सर्व विभागांच्या प्रचलित मानकांमध्ये वाढ करून संचालनालयातील प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांचेकडून सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत कामाचे जादा तास वाढवून, शासकीय सुट्टीच्या दिवशी काम करून प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली. संचालनालयातील कार्यरत मनुष्यबळाकडून कमीत कमी दोन लाख ते दोन लाख 15 हजार प्रकरणांचा  निपटारा करण्याची क्षमता असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार तीन लाख 96 हजार 879 इतक्या प्रकरणांचा  निपटारा करण्यात आला आहे. प्रलंबित प्रकरणांपैकी एक लाख 02 हजार 413 इतक्या जास्त प्रकरणांचा निपटारा करण्यात संचालनालयाला यश आले आहे.

डिसेंबर 2025 अखेर प्रलंबित प्रकरणांपैकी ‘ कन्व्हेक्शनल फॉरेन्सीक’ या विभागाने तीन लाख 96 हजार 275 इतक्या प्रकरणांचा निपटारा केला आहे. तसेच या विभागात 27 हजार 524 आवक प्रकरणांची संख्या असून फेब्रुवारी 2026 पासून ज्या दिवशी प्रकरण आवक होईल, त्याच दिवशी प्रकरणांचे विश्लेषणाचे काम सुरू होईल, त्यामुळे दिवसेंदिवस प्रकरण प्रलंबित असण्याची बाब इतिहासजमा होऊन  पिडितांना जलदगतीने न्याय मिळण्याची व्यवस्था निर्माण होत  आहे. संगणक गुन्हे विभाग, सायबर, ध्वनी व ध्वनीफित विभागातील प्रलंबित प्रकरणांचा निपटाराही जलदगतीने करण्यात येत आहे.

न्यायदान प्रक्रिया जलद झाल्यामुळे पीडितांना वर्षानुवर्षे न्यायासाठी प्रतीक्षा करावी लागणार नाही.  गतिमान न्यायदान  करण्यासाठी न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाची महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संचालनालयाला अधिक सक्षम करण्यावर भर दिला आहे. राज्यातील प्रत्येक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाला ‘ मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ उपलब्ध करून देण्यात येत आहे. या सर्वांचा परिपाक म्हणून न्यायदानाची प्रक्रिया गतिमान होण्यास मदत होत आहे.


 News Feedback

Digital Pune
हरकचंद देवीचंद जैन
 23-01-2026 14:37:07

न्यायालइन प्रक्रीयेत बदल होत नाही भारतीयकरण अत्यंत महत्वाचे होत नाही तो वर फक्त गप्पेबाझी कनिष्ट कोर्टावर कोणाचे अंकूश नाही JMFC कोर्टात एका जज पूढे दिवसात 400ते 500 केसेस जजेस काम करत नाही कूठलीही अकाउंटेब्लीटी नाही एका दिवसात होणार्या निकला साठी 5 10 वर्ष सहज काढतात एका ही जजने कमाचा बोझ बदल तक्रार केली आहे का? आत्महत्या केली आहे का? कोर्टा जज आणी वकीलाची दूकानदारी झाली आहे पक्षकाराचे मरण काल माझी तारिख होती बोर्डावर 500 केसेस होते जज गैरहाजर 1000 पक्षकाराचा वेल पैश्याची बरबादी कोणा समोर तक्रार करायची न्याय व्यवस्थेत सूधार न झाल्यास अराजकता माझेल धंधे रोजगार ब्रेक लागेल प्रत्येक कोर्टात 2 न्यायधीश ते पण गूणवत्ता सभर गाढव भर्ती नको व वेलेत वाढ करणेत यावी त्यानाही वेलेचे बंधन घालणेत यावे हरामाचा पगार सेवा सूविधा 5 5 महिने सूट्टया कूठे तरी थांबायला हवे तक्रार जवाब आरग्यूमेंट व निकाल चार स्टेप जास्तीत जास्त 5 6तारखेत निकाल राजे रजवाडे पंचायती न्याय देत नव्हते का शिवशाही कधी अवतरणार फक्त निवडणूका जिकण्यासाठी महापूरूषाचे नाव घेताना लाजा वाटल्या पाहिजे काम न केल्यास भविष्यात प्रलोभने व मताचा जोगवा मागायला दारोदारी हिडावे लागून ही जिंकण्याची शक्यता नहीवत

 Give Feedback



 जाहिराती