पुणे : प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी २०२६ रोजी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी (आझम कॅम्पस,पुणे कॅम्प) येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात येणार आहे.संस्थेच्या उपाध्यक्षा आबेदा इनामदार हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील . संस्थेचे सचिव प्रा.इरफान शेख यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. आझम कॅम्पस मधील सर्व संलग्न संस्थांचे पदाधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी वर्ग उपस्थित राहणार आहे. आझम कॅम्पस च्या व्हि. एम. गनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे सकाळी साडे आठ वाजता हा सोहळा होणार आहे.त्यानंतर ९ वाजता शारीरिक, शैक्षणिक, आर्थिक, महिला सक्षमीकरण तसेच राष्ट्रीय सुरक्षा विषयावर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.