सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अनेकांची स्वप्नं पूर्ण केली, पण अजितदादांची दोन स्वप्नं अपूर्णच राहिली; वेळेआधीच एक्झिटने महाराष्ट्र सुन्न
  • ज्या मातीतून रोपटं उगवलं त्याच मातीत विलीन होणार! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आज बारामतीत अंत्यसंस्कार, शोकाकुल वातावरण
  • अवघ्या महाराष्ट्राच्या अश्रुंचा बांध फुटला, बारामती पोरकी झाली; अजित पवार पंचत्वात विलीन
  • अजितदादांचा झंझावात बारामतीच्या मातीत कायमचा विसावला; 'कामाचा माणूस' अनंतात विलीन, अवघा सह्याद्री हळहळला
  • : मोठी बातमी : अजित पवारांच्या विमानाचा अपघात, 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती, बारामतीमध्ये लॅंडींगदरम्यान घडली घटना
 शहर

प्रजासत्ताक दिनी आझम कॅम्पस येथे किशोरराजे निंबाळकर यांच्या हस्ते ध्वजवंदन ; ‘सक्षमीकरण’ विषयावर सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात ,संचलनात रोबो परेड

डिजिटल पुणे    27-01-2026 16:35:30

‘पुणे : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर २६ जानेवारी २०२६ रोजी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या आझम कॅम्पस, पुणे येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष  किशोरराजे निंबाळकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. त्यानंतर  ‘सक्षमीकरण’ या विषयावर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या अध्यक्षा आबेदा पी. इनामदार या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. यांनी प्रास्ताविकातून प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व आणि सक्षमीकरणाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला.

यानंतर व्ही. एम. गनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे शारीरिक, शैक्षणिक, आर्थिक, महिला सक्षमीकरण तसेच राष्ट्रीय सुरक्षा या विषयांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीत, नृत्य, नाट्यछटा आणि भाषणांनी उपस्थितांची मने जिंकली.संपूर्ण कार्यक्रम देशभक्तीपूर्ण वातावरणात आणि उत्साहात पार पडला.

या प्रसंगी संस्थेचे सचिव  प्रा. इरफान शेख, डॉ. एन. वाय. काझी, डॉ. आरिफ मेमन, श्रीमती शाहेदा सय्यद, हाजी कदीर कुरेशी, इफ्तेकार इनामदार, हनीफ शेख, तनवीर इनामदार तसेच सर्व ट्रस्टचे विश्वस्त व गव्हर्निंग बोर्ड सदस्य, सर्व संस्थांचे संचालक, प्राचार्य व विभागप्रमुख, अध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी आणि आझम कॅम्पसमधील सर्व संस्थांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संचलनात रोबो परेड

महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या आझम कॅम्पस, पुणे येथे आयोजित प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी २०२६ रोजी संचलनात पी ए इनामदार आय सी टी अकादमी (PAI ICT ACADEMY) च्या रोबोजनी विशेष सहभाग नोंदवला.तिरंगी फुगे घेवून येणारे आणि विद्यार्थ्यां द्वारे रिमोट कंट्रोल ने ऑपरेट होणारे हे रोबो आकर्षण ठरले . तंत्रज्ञान आणि देशभक्ती यांचा सुंदर संगम या संचलनातून अनुभवायला मिळाला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या रोबो परेडने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले आणि आधुनिक भारताचे प्रतीक ठरले.


 Give Feedback



 जाहिराती