सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अनेकांची स्वप्नं पूर्ण केली, पण अजितदादांची दोन स्वप्नं अपूर्णच राहिली; वेळेआधीच एक्झिटने महाराष्ट्र सुन्न
  • ज्या मातीतून रोपटं उगवलं त्याच मातीत विलीन होणार! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आज बारामतीत अंत्यसंस्कार, शोकाकुल वातावरण
  • अवघ्या महाराष्ट्राच्या अश्रुंचा बांध फुटला, बारामती पोरकी झाली; अजित पवार पंचत्वात विलीन
  • अजितदादांचा झंझावात बारामतीच्या मातीत कायमचा विसावला; 'कामाचा माणूस' अनंतात विलीन, अवघा सह्याद्री हळहळला
  • : मोठी बातमी : अजित पवारांच्या विमानाचा अपघात, 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती, बारामतीमध्ये लॅंडींगदरम्यान घडली घटना
 शहर

३१,१ रोजी 'पुणे इंटरनॅशनल डान्स फेस्टिव्हल'

डिजिटल पुणे    29-01-2026 15:47:22

पुणे: इंदिरा युनिव्हर्सिटीचे स्कुल ऑफ लिबरल आर्टस,इन्फोसिस फाऊंडेशन आणि भारतीय विद्या भवनच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय 'पुणे इंटरनॅशनल डान्स फेस्टिव्हल'चे आयोजन दि.३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आले आहे.शास्त्रीय,उपशास्त्रीय,लोकनृत्य,समकालीन अशा अनेक शैलीतील नृत्ये या फेस्टिव्हलमध्ये सादर केली जाणार आहेत.

दि.३१ जानेवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजता ध्रुव सभागृह(इंदिरा युनिव्हर्स कॅम्पस ,ताथवडे) येथे फेस्टिव्हलचे उदघाटन होणार आहे. रात्री ८ पर्यंत विविध नृत्य सादरीकरणे होणार आहेत.दि.१ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता पहिल्या सत्रात आणि सायंकाळी साडेचार ते रात्री ८ या वेळात दुसऱ्या सत्रात फेस्टिव्हलमधील विविध नृत्य सादरीकरणे सरदार नातू सभागृह (भारतीय विद्या भवन,सेनापती बापट रस्ता ) येथे होतील. 'नृत्य आणि मानसिक स्वास्थ ' विषयावर चर्चासत्र होईल.हा महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य आहे.फेस्टिव्हलच्या निमंत्रक रसिका गुमास्ते,समन्वयक सुवर्णा बाग तसेच संयोजन समिती सदस्य नेहा मुथियान,अस्मिता ठाकूर,शमा अधिकारी ,वरदा वैशंपायन यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

*इंडिया इंटरनॅशनल डान्स फेस्टिव्हल ते पुणे इंटरनॅशनल डान्स फेस्टिव्हल*

रसिका गुमास्ते,नेहा मुथियान,अस्मिता ठाकूर,शमा अधिकारी यांनी गेली ७ वर्षे इंडिया इंटरनॅशनल डान्स फेस्टिव्हल चे पुण्यात यशस्वी आयोजन केले.युवा पिढीला व्यासपीठ दिले आणि विशेष मुलांना (स्पेशली एबल्ड) देखील संधी दिली.या वर्षीपासून हाच फेस्टिव्हल पुणे इंटरनॅशनल डान्स फेस्टिव्हल या रूपात पुणेकरांच्या भेटीस येत आहे.पुणे,पिंपरी-चिंचवड भागात आयोजन होईल.'Dance Sans Division' हे फेस्टिव्हल चे ब्रीद आहे .नृत्य सर्वाना एकत्र आणते,कोणत्याही भेदभावाशिवाय,एकत्रितपणे,कोणत्याही विभागणीशिवाय केले जाते,असा त्याचा अर्थ आहे.


 Give Feedback



 जाहिराती