सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अनेकांची स्वप्नं पूर्ण केली, पण अजितदादांची दोन स्वप्नं अपूर्णच राहिली; वेळेआधीच एक्झिटने महाराष्ट्र सुन्न
  • ज्या मातीतून रोपटं उगवलं त्याच मातीत विलीन होणार! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आज बारामतीत अंत्यसंस्कार, शोकाकुल वातावरण
  • अवघ्या महाराष्ट्राच्या अश्रुंचा बांध फुटला, बारामती पोरकी झाली; अजित पवार पंचत्वात विलीन
  • अजितदादांचा झंझावात बारामतीच्या मातीत कायमचा विसावला; 'कामाचा माणूस' अनंतात विलीन, अवघा सह्याद्री हळहळला
  • : मोठी बातमी : अजित पवारांच्या विमानाचा अपघात, 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती, बारामतीमध्ये लॅंडींगदरम्यान घडली घटना
 शहर

‘आपकी अमरी’ नाट्यप्रयोग ३१ जानेवारी रोजी ;अमृता शेरगिल यांच्या पत्रांवर आधारित कार्यक्रम

डिजिटल पुणे    29-01-2026 16:32:18

पुणे: भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत प्रसिद्ध चित्रकार अमृता शेरगिल यांच्या पत्रांवर आधारित ‘आपकी अमरी ’ हा नाट्यप्रयोग पुणेकर रसिकांसाठी सादर केला जाणार आहे. हा कार्यक्रम शनिवार, दि.३१ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता भारतीय विद्या भवनचे  सरदार महादेव बळवंत नातू सभागृह(सेनापती बापट रस्ता) येथे  होणार आहे.शेखर नाईक प्रोडक्शन्सचा हा कार्यक्रम नयन पडवळ प्रस्तुत करणार आहेत. 

 ‘आपकी अमरी ’  या नाट्यप्रयोगात अमृता शेरगिल यांनी आयुष्यातील विविध टप्प्यांवर लिहिलेल्या पत्रांचे हिंदी भाषेत नाट्यात्म सादरीकरण करण्यात येणार आहे. या पत्रांतून त्यांच्या वैयक्तिक भावना, कला-दृष्टी, सामाजिक जाणिवा आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन उलगडतो. या संकल्पनेला रंगमंचावर सजीव रूप देण्याचे दिग्दर्शन ज्येष्ठ रंगकर्मी शेखर नाईक यांनी केले आहे.

या नाट्यप्रयोगात मुग्धा भोसले आणि सानिका आपटे या कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार असून, त्यांच्या सशक्त अभिनयातून अमृता शेरगिल यांचे व्यक्तिमत्त्व प्रेक्षकांसमोर उभे राहणार आहे. नाटकाची संहिता शेखर नाईक आणि रमेशचंद्र पाटकर यांनी लिहिली असून, हिंदी अनुवाद चैतन्य कुलकर्णी आणि नचिकेत देवस्थळी यांनी केला आहे. संगीत दिग्दर्शन चैतन्य आडकर यांचे आहे. रंगमंच रचना राज सांडभोर, प्रकाशयोजना प्रफुल्ल दीक्षित आणि वेशभूषा संकल्पना वैशाली ओक यांनी साकारली आहे. निर्मितीची जबाबदारी गायत्री चक्रदे यांनी सांभाळली आहे.

भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर केला जाणारा हा २७७ वा प्रयोग  आहे.प्रवेश विनामूल्य असल्याची माहिती  भारतीय विद्या भवन चे मानद सचिव  प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी दिली. 


 Give Feedback



 जाहिराती