सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी राजकीय घडामोड : राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबातच राहणार? सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार चर्चा
  • मोठी बातमी! राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगानेही तपास
  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
  • शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही मोठी गर्दी
 जिल्हा

उरण एसटी डेपो ने गाड्यांच्या संख्येत वाढ करावी. शहर चिटणीस शेखर पाटील यांची मागणी.

विठ्ठल ममताबादे ( प्रतिनिधी )    31-01-2026 13:18:55

उरण : महाराष्ट्र शासनाच्या परिवहन महामंडळच्या उरण डेपोने गाड्यांच्या संख्येत वाढ करावी व  सातत्याने होणाऱ्या एसटीच्या फेऱ्या रद्द करू नये यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे शहरचिटणीस शेखर पाटील यांनी डेपो मॅनेजर अमोल दराडे यांना निवेदन प्रस्तुत केले.निवेदन देऊन शेखर पाटील यांनी प्रवाशांच्या सेवेसाठी विविध मागण्या केल्या आहेत.उरण डेपो मध्ये यात्रा सहल इत्यादी कारणास्तव सकाळच्या सत्राच्या साडेसहा वाजता ची पेंण दादर पनवेल व इतर टाइमिंगच्या गाड्या रद्द करण्यात येतात तर कधी कंडक्टर ड्रायव्हर  येत नसल्याने गाड्या रद्द होणे तर ड्रायव्हर कंडक्टर उशिरा येत असल्याने गाड्या उशिरा सुटणे यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. कामगार वर्गाला वेळेवर पोहोचता येत नाही यासंदर्भात प्रवाशांनी तक्रारी देऊन देखील दखल घेतली जात नाही त्यामुळे प्रवासी वर्गाला  त्रास सहन करावा लागतो त्यामुळे एसटीचा प्रवासी वर्ग कमी होऊन उत्पन्नात घट होत आहे.

पनवेल  पेण  दादर मार्गावर फेऱ्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे. मात्र गाड्यांची संख्या अपुरी आहे.त्यासाठी उरण डेपोने ज्यादा गाड्या मागवण्याची गरज आहे.या डेपोंतून पनवेल दादर व पेण कडे जाणाऱ्या प्रवासी वर्गाची संख्या मोठी असून त्यामुळे नक्कीच उत्पन्नात वाढ होईल.त्याचबरोबर प्रवाशांना देखील ज्यादा बस सेवेचा फायदा होईल. उरण पनवेल जलद गाड्या सोडण्याची आवश्यकता आहे.तसेच नवघर रेल्वे स्टेशन  न्हावा शेवा रेल्वे स्टेशन  इथेही गाड्या सोडण्याची आवश्यकता आहे.येथून पूर्व विभागात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे .करंजा व मोरा मार्गावर प्रवासी बस नियमित वेळेत सोडाव्यात तसेच विद्यार्थ्यांच्या पास साठी नऊ ते पाच ही वेळ पाळावी.

त्याचबरोबर महिलांच्या व पुरुषांची  स्वच्छतागृह  वीज व पाणी सुविधाची उत्तम व्यवस्था करावी.त्यामुळे प्रवाशांची कुचंबना होणार नाही. यासंदर्भात उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे उरण शहर चिटणीस शेखर पाटील यांनी डेपो मॅनेजर अमोल दराडे यांना केल्या आहेत.उरण डेपो हा रायगड जिल्ह्यामध्ये एक नंबरचा उत्पन्न देणारा डेपो राहिला आहे त्यासाठी प्रयत्न करावेत व डेपोला गतवैभव प्राप्त करून द्यावे उरणहून लांब पल्ल्याच्या गाड्या पुन्हा सुरू कराव्यात अशी मागणी करण्यात आली.यावेळी विधानसभा अध्यक्ष नयना पाटील. उरण क्राईम ब्रांच अध्यक्ष नारायण पाटील उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती