सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी राजकीय घडामोड : राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबातच राहणार? सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार चर्चा
  • मोठी बातमी! राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगानेही तपास
  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
  • शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही मोठी गर्दी
 जिल्हा

पर्यावरण व मानव–वन्यजीव संघर्ष या विषयांवर जनजागृती

विठ्ठल ममताबादे ( प्रतिनिधी )    31-01-2026 14:31:07

उरण : पोसरी ठाकूरवाडी येथील रायगड जिल्हा प्राथमिक शाळा, पोसरी, रसायनी,तालुका पनवेल येथे पिल्लई कॉलेज,रसायनी राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या विशेष श्रम संस्कार शिबिरात  फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन) सर्पमित्र निसर्गसंवर्धन संस्था,चिरनेर-उरण,रायगड( महाराष्ट्र ) तर्फे शून्य सर्पदंश मृत्यू अभियान व संस्थेच्या स्नेक बाईट ऍकशन टीम(S.A.T)" या विषयावर संस्थेचे  सदस्य तुषार अनंता कांबळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना  सर्प ओळख,सर्पदंश कसे टाळावे व सर्पदंश झाल्यास काय करावे ? संस्थेच्या शून्य सर्पदंश मृत्यू अभियान आणि स्नेक बाईट ऍकशन टीम (S.A.T) प्रकल्पाबद्दल तसेच पर्यावरण व मानव–वन्यजीव संघर्ष या विषयांवर जनजागृती केली. उपस्थित विद्यार्थ्यांना रात्री ०८ ते १० वाजेपर्यंत २ तास मार्गदर्शन केले. मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनियरिंग या दोन्ही विभागाची  एकूण ५० मुली –मुले या कार्यक्रमासाठी उपस्थिती होती.भविष्यात  अश्या कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांना एखादा वन्यजीव (साप) वाचविण्यास तसेच कोणास चुकून सर्पदंश झाल्यास तो साप विषारी अथवा बिनविषारी हे ओळखण्यास मदत होईल.सदर कार्यक्रमासाठी पिल्लई कॉलेज रसायनी चे प्राध्यापक विक्रम पवार, वैभव भगत,अपूर्वा देशपांडे,सायली कुलकर्णी इ.शिक्षक तसेच फॉन संस्थेतर्फे अलका अनंता कांबळे व स्नेहा तुषार कांबळे यांची कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती व सहकार्य लाभले.


 Give Feedback



 जाहिराती