उरण : मास्टर्स गेम्स असोसिएशन आयोजित पहिली संयुक्त राष्ट्रीय मास्टर्स स्पर्धा २०२६ नाशिक येथे दिनांक २८ आणि २९ जानेवारी २०२६ रोजी संपन्न झाल्या.या स्पर्धेत श्री समर्थ कृपा स्पोर्ट्स अकॅडमी दादरपाडा च्या प्रशिक्षकांनी नेत्रदीपक कामगिरी केली.उरण तालुक्याचे सुपुत्र स्नेहल राम पालकर यांनी ३५ वर्षांवरील पुरुष या गटामधील ४०० मीटर धावणे, ८०० मीटर धावणे आणि थाळीफेक या स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले.चेतना स्नेहल पालकर यांनी ३५ वर्षांवरील महिला या गटामधील ४०० धावणे, ८०० मीटर धावणे आणि तिहेरी उडी या स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले.समाधान चांगू कणेकर यांनी ३५ वर्षांवरील पुरुष या गटामधील ४०० मीटर हर्डल्स मधे सुवर्णपदक आणि १५०० मीटर धावणे मधे रौप्यपदक तसेच २०० मीटर धावणे मधे कांस्यपदक प्राप्त केले.तसेच त्यांचे खोपोली येथील सहकारी अमित पांडुरंग विचारे यांनी ४० वर्षांवरील पुरुष या गटांमधील १००००मीटर धावणे, ५००० मीटर धावणे, १५०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक प्राप्त केले.
तर दिलीप विचारे यांना ५५ वर्षांवरील पुरुष गटामध्ये २०० मीटर धावणे मधे कांस्यपदक,महेश भोसले यांना ५ किमी जलद चालणे या स्पर्धा प्रकारात रौप्यपदक,मनीष खवळे यांना बांबू उडी मधे कांस्यपदक,दत्ता दांगड यांना नेमबाजी स्पर्धेत कांस्यपदक मिळाले.रूपेश म्हात्रे यांनी उंचउडी, ११० मीटर अडथळा शर्यत मध्ये सुवर्णपदक आणि तिहेरी उडी मधे कांस्यपदक प्राप्त केले.विश्वास खुटले यांनी भालाफेक स्पर्धेत रौप्यपदक प्राप्त केले.तसेच या सर्वांनी रिले आणि मिक्स रिले या दोन स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून खेळताना सुवर्ण आणि रौप्यपदक प्राप्त करून महाराष्ट्र साठी प्रथम क्रमांकाची चॅम्पियनशिप मिळवून देण्यात मोठे योगदान दिले.त्यांच्या या यशाबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.