सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी राजकीय घडामोड : राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबातच राहणार? सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार चर्चा
  • मोठी बातमी! राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगानेही तपास
  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
  • शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही मोठी गर्दी
 राजकारण

मोठी बातमी : सुप्रिया सुळेंच्या कार्यपद्धतीवर नाराजी; अजित पवार गटाचा विलिनीकरणाला विरोध — राष्ट्रवादीत नवा पेच

डिजिटल पुणे    31-01-2026 16:56:39

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वबदल आणि पक्षाच्या भविष्यासंदर्भात मोठी घडामोड घडली आहे. अजित पवार गटाच्या आमदारांनी सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली असून याबाबतचे अधिकृत पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आले आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत आज संध्याकाळी ५ वाजता सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शरद पवार गटाकडून एकत्र येण्याबाबत अनुकूल भूमिका व्यक्त केली जात असली, तरी अजित पवार गटातील बहुतांश मंत्री आणि आमदारांनी मात्र विलिनीकरणाला स्पष्ट विरोध दर्शविल्याचे विश्वसनीय सूत्रांचे म्हणणे आहे.

अजित पवार गटाचा स्पष्ट विरोध

सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवार गटातील अनेक आमदार व नेते सुप्रिया सुळे यांच्या कार्यशैलीवर नाराज आहेत. त्यामुळे सध्या तरी विलिनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम मिळावा, अशी या गटाची भूमिका आहे. शरद पवार गट एकत्र येण्यास इच्छुक असताना, अजित पवार गटाने वेगळी भूमिका घेतल्याने राष्ट्रवादीतील अंतर्गत मतभेद पुन्हा उघड झाले आहेत.

सुनेत्रा पवार आज शपथ घेणार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवार आज सायंकाळी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. शपथविधीनंतर त्या तातडीने बारामतीला रवाना होणार असून अजित पवार यांच्या दहाव्यापर्यंत त्या तेथेच थांबणार असल्याचे सांगितले जात आहे. या काळात त्या कार्यकर्त्यांना भेटतील, मात्र हार-तुरे स्वीकारणार नाहीत, अशी माहिती आहे.

राजकीय समीकरणे बदलणार?

शरद पवार गटाकडून विलिनीकरणाची चर्चा पुढे रेटली जात असताना, अजित पवार गटाने घेतलेली भूमिका राष्ट्रवादीतील अंतर्गत राजकारण अधिक गुंतागुंतीचे करणार असल्याचे मानले जात आहे. आगामी काळात या घडामोडींचे पडसाद राज्याच्या राजकारणावरही उमटण्याची शक्यता आहे.


 Give Feedback



 जाहिराती